Kitchen Tips: पुरी खायला सगळ्यांनाच आवडते. पण घरी बनवलेली पुरी कधी कडक होते, कधी तेल पिते, तर कधी फुगतच नाही. यामुळे पुरी खाण्याचा सगळा मूड जातो. पण पुरी छान टम्म फुगलेली आणि तरी हेल्दी व्हावी असं वाटत असेल, तर ही सोपी ट्रिक नक्की फॉलो करा.
पुरी बनवणं दिसायला सोपं वाटत असलं तरी, ती परफेक्ट बनवणं तितकं सोपं नाही. अनेकजण घरी पुरी बनवतात, पण ती नीट फुगत नाही, जास्त तेल पिते किंवा मऊ होण्याऐवजी कडक होते. कितीही वेळा प्रयत्न केला तरी हीच समस्या येते. शेवटी लोक घरी पुरी बनवणंच सोडून देतात. पण हॉटेलसारखी सोनेरी रंगाची, कुरकुरीत पुरी बनवण्यासाठी ही छोटीशी टेक्निक फॉलो करा.
25
पुरी बनवण्यामागचं सिक्रेट
पुरी बनवण्यामागचं खरं सिक्रेट आहे रवा. एक कप गव्हाच्या पिठात एक ते दोन चमचे बारीक रवा घातल्यास पिठाला छान टेक्स्चर मिळतं. यामुळे पुऱ्या तळताना कमी तेल शोषून घेतात. तसेच, त्या छान फुगतात आणि कुरकुरीत होतात.
35
पीठ मळण्याची योग्य पद्धत
पीठ मळण्याच्या पद्धतीतच खरी जादू आहे. पीठ खूप मऊ न मळता थोडं घट्ट मळावं. पीठ चांगलं मळून झाल्यावर किमान 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवा. असं केल्यामुळे पिठातील ग्लुटेन सेट होतं आणि तळताना पुऱ्या व्यवस्थित फुगतात. तळण्यासाठी वापरलेलं तेलही खूप महत्त्वाचं आहे. तेल चांगलं गरम आणि चकचकीत असावं, पण त्यातून धूर येता कामा नये, हे लक्षात ठेवा. योग्य तापमानात तळल्यास पुऱ्या लगेच टम्म फुगतात.
पुरीसाठी हेल्दी ऑप्शन हवा असेल, तर या सोप्या टिप्स फॉलो करा. पुरीसाठी गव्हाचं पीठ वापरल्यास जास्त फायबर मिळतं. पीठ नेहमी घट्ट मळा. ते मऊ असेल तर जास्त तेल शोषून घेतं. पुरी लाटताना जास्त कोरडं पीठ वापरू नका. त्याऐवजी पोळपाटावर थोडं तेल लावलं तरी पुरेसं आहे. पचनक्रिया चांगली राहावी यासाठी तुम्ही पिठात चिमूटभर जिरंही घालू शकता.
55
पुरी तळून झाल्यावर...
पुरी तळून झाल्यावर ती पेपर टॉवेलवर किंवा स्टीलच्या रॅकवर ठेवा. यामुळे अतिरिक्त तेल निघून जातं. या छोट्या-छोट्या बदलांमुळे तुम्ही घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल, कमी तेलकट, सोनेरी रंगाच्या आणि कुरकुरीत पुऱ्या सहज बनवू शकता.