Kitchen Tips: डाळ तडका (Dal Tadka) किंवा वरण-भात हा प्रत्येक भारतीय घरात रोज बनतो. पण घरी बनवलेल्या डाळीला ढाब्यासारखी किंवा रेस्टॉरंटसारखी चव आणि सुगंध का येत नाही? यामागे एक खास कारण आहे.
वरण किंवा डाळ हा भारतीय जेवणातील एक अविभाज्य भाग आहे. तुरीची, मुगाची किंवा मसूरची, कोणतीही डाळ असो, तिची खरी चव फोडणीवर अवलंबून असते. अनेकदा आपण घरी बनवलेल्या डाळीला रेस्टॉरंट किंवा ढाब्यासारखी चव येत नाही. याचं कारण मसाल्यांची कमतरता नसून, फोडणी देण्याच्या पद्धतीत होणाऱ्या छोट्या चुका आहेत.
26
१. तेल किंवा तुपाचं तापमान
फोडणी देताना होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे तेल किंवा तूप जास्त गरम करणे. तेल जास्त तापल्यास त्यात जिरे, लसूण किंवा सुकी मिरची टाकल्यावर ते लगेच जळून जातात. जळलेले मसाले संपूर्ण डाळीची चव कडवट करतात. त्यामुळे फोडणी नेहमी मध्यम आचेवरच तयार करा.
36
२. जिरे घालण्याची योग्य वेळ
जिरे फोडणीचा आत्मा आहेत. तेल योग्य तापमानावर गरम झाल्यावर सर्वात आधी जिरे टाका. जिरे चांगले तडतडले की त्यातून नैसर्गिक तेल आणि सुगंध बाहेर येतो. जिरे काळे होणार नाहीत याची काळजी घ्या. ते हलके सोनेरी झाले की लगेच इतर साहित्य घाला.
लसूण फोडणीला एक अप्रतिम चव देतो. लसूण ठेचून किंवा बारीक चिरून तो हलका सोनेरी होईपर्यंत परता. लसूण कच्चा राहिल्यास त्याचा उग्र वास येतो आणि जास्त तळल्यास तो कडवट लागतो. कांद्याचंही तसंच आहे. कांदा पारदर्शक होऊन सोनेरी रंगावर येईपर्यंत परतावा.
56
४. लाल तिखट जळू देऊ नका
हॉटेलच्या डाळीला आकर्षक लाल रंग येण्यासाठी एक खास ट्रिक वापरली जाते. फोडणी तयार झाल्यावर गॅस बंद करा किंवा मंद आचेवर ठेवा. सगळ्यात शेवटी लाल तिखट घाला आणि लगेचच ही फोडणी डाळीवर ओता. यामुळे तिखट जळत नाही आणि डाळीचा रंग व चव दोन्ही छान टिकून राहतात.
66
५. झाकण ठेवण्याची ट्रिक
फोडणी डाळीवर ओतल्यानंतर, पातेल्यावर किमान 2-3 मिनिटं झाकण ठेवा. असं केल्याने फोडणीचा सुगंध आणि स्वाद बाहेर न जाता डाळीमध्येच मुरतो. यालाच हॉटेलमध्ये 'दम देणे' म्हणतात. डाळीची चव फक्त मीठ-तिखटावर अवलंबून नसते, तर तुम्ही वापरलेल्या डाळीची गुणवत्ता आणि फोडणीच्या संतुलनावरही असते. तेलाऐवजी तुपाची फोडणी दिल्यास डाळ अधिक चविष्ट आणि 'रिच' लागते.