LPG गॅसच्या वाढत्या किमतींमुळे तो जपून वापरणं खूप गरजेचं झालं आहे. काही सोप्या बदलांमुळे तुम्ही सिलेंडर 15 ते 20 दिवस जास्त वापरू शकता. सिलेंडर तुटवड्याची भीती वाटत असेल, तर या टिप्स तुमच्यासाठीच आहेत. चला, जाणून घेऊया सविस्तर.
26
1. स्वयंपाकाचं आधीच नियोजन करा
स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सगळ्या भाज्या चिरून घ्या आणि मसाले तयार ठेवा. ही गॅस वाचवण्याची सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे. गॅस पेटवल्यानंतर कांदा कापणे किंवा मसाले शोधल्यास वेळ आणि गॅस दोन्ही वाया जातो. पूर्वतयारी केल्यास तुम्ही गॅसचा वापर 5-10 मिनिटं कमी करू शकता.
36
2. ओली भांडी वापरणं टाळा
अनेकजण भांडी धुतल्याबरोबर ओलीच गॅसवर ठेवतात. ही एक मोठी चूक आहे. भांडं ओलं असेल, तर आधी ते पाणी सुकवण्यासाठी जास्त गॅस खर्च होतो आणि मग स्वयंपाक सुरू होतो. भांडं नेहमी एका सुक्या कापडाने पुसून मगच गॅसवर ठेवा. यामुळे महिन्याभरात मोठी गॅस बचत होते.
गॅसच्या बर्नरपेक्षा लहान भांडं वापरल्यास, आगीच्या ज्वाला भांड्याच्या बाजूने बाहेर जातात. यामुळे गॅस वाया जातो. नेहमी पसरट आणि बर्नरच्या आकाराचं भांडं वापरा. यामुळे उष्णता सगळीकडे सारखी पसरते आणि जेवण लवकर शिजतं. गॅसची फ्लेम नेहमी मध्यम ठेवा. जास्त आचेमुळे जेवण लवकर शिजत नाही, उलट गॅस लवकर संपतो.
56
4. झाकण ठेवून शिजवा आणि प्रेशर कुकर वापरा
स्वयंपाक करताना भांड्यावर झाकण ठेवल्यास वाफ आतच राहते आणि अन्न 25% लवकर शिजतं. डाळ, भात आणि कठीण भाज्यांसाठी नेहमी प्रेशर कुकर वापरा. यामुळे वेळ आणि गॅस दोन्हीची बचत होते. डाळी किंवा कडधान्यं शिजवण्यापूर्वी 30 मिनिटं भिजवून ठेवल्यास ती लवकर शिजतात.
66
5. बर्नर आणि रेग्युलेटरची काळजी घ्या
अन्न सांडल्यामुळे किंवा गंज लागल्यामुळे बर्नरची छिद्रं बंद झाली, तर गॅस नीट बाहेर येत नाही आणि इंधन वाया जातं. जर तुमच्या गॅसची ज्योत निळ्याऐवजी पिवळी किंवा नारंगी दिसत असेल, तर बर्नर साफ करण्याची गरज आहे. रेग्युलेटर आणि ट्यूबमध्ये गळती (Leakage) आहे का, हे आठवड्यातून एकदा तपासा.
अतिरिक्त टिप्स:
फ्रिजमधून काढलेलं दूध किंवा भाज्या थेट गॅसवर ठेवू नका. त्यांना रूम टेंपरेचरवर येऊ द्या. गॅस सुरू असताना जवळ फॅन जोरात लावू नका, यामुळे उष्णता वाया जाते.