Kitchen Tips: सध्या गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. अशावेळी घरात गॅस संपला की अनेकजण इंडक्शनचा वापर करतात. हा वीजेवर चालत असल्याने गॅससारखा तो अचानक संपत नाही, हा त्यातला मोठा फायदा. याचा उपयोग नक्की कसा करावा जाणून घेऊया….
सध्या अनेकांना गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नाही. अशावेळी गॅस संपला की लोक इंडक्शनकडे वळतात. गॅससारखा तो अचानक संपण्याची भीती नसते, हा सर्वात मोठा दिलासा आहे.
29
आजच्या परिस्थितीत इंडक्शन खूप सोयीस्कर आहे
गॅसप्रमाणे इंडक्शन बंद करायला थांबायची गरज नाही, कारण ठराविक वेळेनंतर तो आपोआप बंद होतो. रोज वापरल्यास वीज बिल वाढू शकतं, पण आजच्या परिस्थितीत इंडक्शन खूप सोयीस्कर ठरतो.
39
इंडक्शन कुकटॉप गॅस शेगडीपेक्षा वेगळे असतात
आजकाल ग्लास-टॉप गॅस शेगडीपेक्षा कमी किमतीत इंडक्शन मिळतात. विशेष म्हणजे, तुमच्या घरी सोलर पॅनल असेल तर तुम्ही अगदी कमी खर्चात स्वयंपाक करू शकता.
इंडक्शन वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कुकरच्या पृष्ठभागावर दिलेल्या वर्तुळापेक्षा कमी तळाची भांडी वापरणे टाळा, यामुळे वीज वाया जाते.
59
आवश्यकतेनुसारच पाण्याचा वापर करा
स्वयंपाकासाठी आवश्यक तेवढंच पाणी वापरा. पाणी उकळल्यानंतर तुम्ही इंडक्शनची पॉवर कमी करू शकता. यामुळे विजेची बचत होते.
69
सपाट तळ असलेली भांडी वापरा
स्वयंपाकासाठी आधी इंडक्शनवर भांडं ठेवा आणि मगच तो सुरू करा. तसेच, इंडक्शन बंद केल्यावरच भांडं बाजूला काढा. नेहमी सपाट तळ असलेली भांडी वापरा.
79
एकच पॅनल असल्याने स्वच्छता करणे सोपे
इंडक्शनचा पृष्ठभाग सपाट असल्याने तो स्वच्छ करणं खूप सोपं आहे. तुम्ही डिश सोप, बेकिंग सोडा, व्हिनेगर किंवा सिरॅमिक पृष्ठभागासाठी बनवलेले क्लिनर वापरू शकता.
89
इंडक्शन बंद केल्यावरच भांडे काढा
नेहमी लक्षात ठेवा, इंडक्शनवर भांडं ठेवल्यावरच तो सुरू करावा. स्वयंपाक झाल्यावर आधी इंडक्शन बंद करा आणि त्यानंतरच भांडं बाजूला घ्या.
99
वेळ सेट करून ठेवण्याची सोय
इंडक्शनवर भांडं ठेवल्यावरच तो सुरू होतो. याशिवाय, तुम्ही त्यावर स्वयंपाकासाठी ठराविक वेळ सेट करून ठेवू शकता, त्यामुळे पदार्थ करपण्याची भीती नसते.