Kitchen Tips: किचनमधून येणाऱ्या स्वयंपाकाच्या वासाने त्रस्त आहात? व्हेंटिलेशन, लिंबू-व्हिनेगरने स्वच्छता, मसाल्यांचा सुगंध, रोजची साफसफाई आणि नैसर्गिक रोपं यांसारख्या ५ सोप्या टिप्स वापरून मिनिटांमध्ये हा वास घालवा आणि घरातील हवा ताजी करा.
स्वयंपाक करताना किचनमधून मसाले, तळलेले पदार्थ किंवा कांदा-लसणाचा तीव्र वास येणे सामान्य आहे. पण, हाच वास घरात तासनतास राहिल्यास त्रास वाढतो. अनेकदा स्वयंपाक झाल्यानंतरही किचन आणि लिव्हिंग एरियामध्ये एक विचित्र वास येत राहतो. तुमच्या घरातही हीच समस्या असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही किचनमधील दुर्गंध मिनिटांत दूर करू शकता आणि घरातील हवा पुन्हा ताजी बनवू शकता.
26
स्वयंपाक करताना व्हेंटिलेशनची विशेष काळजी घ्या
स्वयंपाक करताना वास पसरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे योग्य व्हेंटिलेशन नसणे. स्वयंपाक करताना चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅन नक्की चालू ठेवा. जर चिमणी नसेल, तर खिडक्या आणि दारे उघडी ठेवा, जेणेकरून धूर आणि वास बाहेर जाईल. हवेचा चांगला प्रवाह दुर्गंध साचू देत नाही.
36
लिंबू आणि व्हिनेगरने नैसर्गिक स्वच्छता करा
लिंबू आणि व्हिनेगर दोन्ही नैसर्गिक दुर्गंधनाशक म्हणून काम करतात. किचनचा ओटा, गॅस शेगडी आणि सिंक लिंबाच्या रसाने किंवा व्हिनेगरच्या पाण्याने स्वच्छ करा. यामुळे तेलकटपणा दूर होईल आणि वासही नाहीसा होईल. तुम्ही हवं तर एका वाटीत व्हिनेगर काही वेळासाठी किचनमध्ये ठेवू शकता, ते हवेतील वास शोषून घेते.
जर फोडणीचा किंवा तळलेल्या पदार्थांचा वास खूप तीव्र असेल, तर एका पॅनमध्ये पाणी घेऊन त्यात दालचिनी, लवंग किंवा तमालपत्र उकळा. त्यांचा सुगंध किचनमध्ये पसरून जेवणाच्या वासाला नाहीसा करतो आणि घरात एक मंद, ताजा सुगंध दरवळतो.
56
रोजची स्वच्छता आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट
किचनमध्ये ठेवलेला ओला कचरा किंवा खरकटी भांड्यांमुळेही वास येतो. त्यामुळे रोजच्या रोज कचरा बाहेर टाका आणि सिंकमध्ये अडकलेले अन्नाचे कण स्वच्छ करा. रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा आणि गॅस कोमट पाण्याने पुसून घेणे ही एक चांगली सवय आहे.
66
सुगंधी रोपे आणि नैसर्गिक फ्रेशनरचा वापर करा
किचनमध्ये पुदिना, तुळस किंवा लेमनग्राससारखी रोपे ठेवल्यानेही वास कमी होतो. ही रोपे केवळ हवाच शुद्ध ठेवत नाहीत, तर नैसर्गिक फ्रेशनर म्हणूनही काम करतात. तुम्ही एका वाटीत बेकिंग सोडा देखील ठेवू शकता, तो वास शोषून घेतो.