सिंकजवळ ओलावा असल्याने, कार्डबोर्ड बॉक्समधील क्लीनर्स ठेवू नयेत. क्लीनर्स हवेशीर आणि कोरड्या जागी ठेवणे योग्य आहे. नाहीतर ते खराब होऊ शकतात.
सिंकजवळ भांडी ठेवल्यास, ओलावा टिकून राहतो आणि जंतू व दुर्गंधी निर्माण होते. यामुळे बुरशी आणि जंतुसंसर्ग होऊ शकतो. भांडी सुरक्षित अंतरावर ठेवा.
सिंकजवळ खाद्यपदार्थ ठेवणे टाळा. ओलावा आणि हवेशीर जागेच्या अभावामुळे भाज्या, फळे, बेकरी उत्पादने लवकर खराब होतात आणि त्यांना बुरशी लागू शकते.
सिंकजवळ इलेक्ट्रिक उपकरणे ठेवणे धोकादायक ठरू शकते. ओलाव्यामुळे मिक्सर, ओव्हनसारखी उपकरणे खराब होऊन मोठे अपघात होऊ शकतात.
लाकडी वस्तू सिंकजवळ ठेवू नका. त्या ओलावा शोषून घेतात, लवकर खराब होतात आणि त्यांना बुरशी लागते. कटिंग बोर्ड, लाकडी चमच्यांबद्दल विशेष काळजी घ्या.
Marathi Desk 1