Kitchen Tips: तुम्ही घरी डोसा बनवता का? पण तुम्हाला माहीत आहे का, की नकळतपणे होणाऱ्या काही चुकांमुळे तुम्ही हेल्दी समजून खात असलेला डोसा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो? कोणत्या आहेत या चुका आणि त्या कशा टाळायच्या? जाणून घ्या
नाश्त्यामध्ये डोसा खायला अनेकांना आवडतो. शिवाय, तो बनवायला सोपा असल्यामुळे लोक घरीच तयार करतात. पण डोसा बनवताना अनेकजण काही चुका करतात, ज्या त्यांना कळतही नाहीत. या चुकांमुळे तुमचा आवडता डोसा आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. चला तर मग, जाणून घेऊया कोणत्या चुका टाळायला हव्यात.
26
1. डोशाचं पीठ तयार करण्याची पद्धत
डोसा बनवण्यासाठी आधी डाळ-तांदूळ वाटून पीठ आंबवण्यासाठी ठेवावं लागतं. अनेकजण याच प्रक्रियेत चूक करतात. पीठ वाटल्यावर ते जास्त वेळ उबदार जागी किंवा बाहेर ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया वाढतात आणि आंबट वास येतो. उन्हाळ्यात पीठ लवकर आंबतं, तर हिवाळ्यात जास्त वेळ लागतो. त्यामुळे, ऋतूनुसार पीठ किती वेळ ठेवायचं याची काळजी घ्या. उन्हाळ्यात 6 ते 8 तासांपेक्षा जास्त वेळ पीठ बाहेर ठेवू नका. हिवाळ्यात 12 तास ठेवलं तरी चालतं. ही छोटीशी गोष्ट न पाळल्यास डोशाची चव बिघडते.
36
2. डोशातील बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग
मसाला डोशामध्ये बटाट्याची भाजी भरतात. पण अनेकजण कोणत्या प्रकारचा बटाटा वापरत आहेत याकडे लक्ष देत नाहीत. कोंब आलेले किंवा हिरवे डाग पडलेले बटाटे भाजीसाठी वापरू नयेत. असे बटाटे आरोग्यासाठी हानिकारक असतात. तसेच, ही भाजी जास्त वेळ रूम टेंपरेचरला ठेवू नये, कारण शिजवलेला बटाटा लवकर खराब होतो आणि त्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं.
डोशासाठी डाळ आणि तांदूळ खरेदी करताना ते खूप जुने नाहीत ना, याची खात्री करा. कारण खूप जुने धान्य वापरल्यास त्यावर बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. शिवाय, अनेकजण बाहेरून तयार डोशाचं पीठ आणतात. त्यात चांगल्या दर्जाची डाळ-तांदूळ वापरलेली नसू शकते. त्यामुळे, घरीच पीठ तयार करणं उत्तम. जर तुमच्या पिठाला आंबट वास येत असेल, तर ते फेकून देणंच चांगलं.
56
4. नॉन-स्टिक कोटिंग तपासा
तुम्ही डोसा बनवण्यासाठी नॉन-स्टिक पॅन वापरत असाल, तर त्याचं कोटिंग नक्की तपासा. जर टेफ्लॉन कोटिंग निघत असेल, तर तापल्यावर ते तुमच्या डोशामध्ये घातक रसायनं सोडू शकतं, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे, नॉन-स्टिक पॅनऐवजी लोखंडाचा तवा किंवा ज्याचं कोटिंग खराब झालेलं नाही, असाच नॉन-स्टिक पॅन वापरा.
66
5. तेल आणि पाण्याची शुद्धता
डोशाच्या पिठात मिसळले जाणारे पाणी आणि डोसा बनवण्यासाठी वापरले जाणारे तेल शुद्ध असावे. डोशाचे पीठ नेहमी स्वच्छ पाण्यानेच भिजवा. वापरले जाणारे तेलही चांगल्या दर्जाचे असावे. नाहीतर, आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.