Mobile Market: iPhone, iPad मधल्या 'i' चा अर्थ फक्त इंटरनेट नाही, मग काय?

Published : Apr 09, 2026, 09:35 PM IST

Mobile Market: iPhone, iPad सारख्या Apple च्या उत्पादनांमध्ये 'i' हे अक्षर तुम्ही पाहिलं असेल. याचा अर्थ फक्त 'इंटरनेट' नाही. यामागे 5 इंटरेस्टिंग अर्थ दडले आहेत. स्टीव्ह जॉब्ज हे हा 'माइंड गेम' का खेळले, चला जाणून घेऊया.

PREV
15
ॲपलच्या उत्पादनांमध्ये 'i' मागचं खरं रहस्य
जगभरात ॲपलच्या iPhone, iPad आणि iMac ची जबरदस्त क्रेझ आहे. पण या नावांपुढील 'i' या छोट्या अक्षराचा खरा अर्थ अनेकांना माहीत नाही. अनेकांना वाटतं की याचा अर्थ फक्त इंटरनेट आहे, पण ॲपलच्या मते याचे पाच वेगवेगळे अर्थ आहेत, जे कंपनीचं व्हिजन दाखवतात.
25
स्टीव्ह जॉब्ज यांचा माइंड गेम

ॲपलच्या उत्पादनांमध्ये 'i' वापरण्याची सुरुवात 1998 मध्ये 'iMac' च्या लाँचने झाली. ॲपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांनी हे उत्पादन सादर करताना 'i' अक्षराचं महत्त्व सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की 'i' चा मुख्य अर्थ 'इंटरनेट' असला तरी, त्याचे इतर चार अर्थ आहेत - इंडिव्हिज्युअल, इन्स्ट्रक्ट, इन्फॉर्म आणि इन्स्पायर.

35
इंटरनेट आणि वैयक्तिक ओळख
ज्यावेळी iMac लाँच झाला, तेव्हा इंटरनेट क्रांती नुकतीच सुरू झाली होती. कॉम्प्युटरला इंटरनेटशी सहज जोडणं हे ॲपलचं ध्येय होतं. म्हणून 'i' म्हणजे इंटरनेट. सोबतच, 'i' म्हणजे 'इंडिव्हिज्युअल' म्हणजेच वैयक्तिक ओळख. प्रत्येक वापरकर्त्याला आपल्या गरजेनुसार उत्पादन वापरता यावं, हे ॲपलचं उद्दिष्ट होतं.
45
ज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण
'i' मधील 'इन्स्ट्रक्ट' या शब्दाचा अर्थ आहे शिकवणे. ॲपलची उत्पादनं केवळ कामासाठी किंवा मनोरंजनासाठी नाहीत, तर विद्यार्थ्यांना आणि शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनाही उपयोगी पडावीत. तर 'इन्फॉर्म' म्हणजे माहिती देणे. इंटरनेटद्वारे जगभरातील माहिती वेगाने मिळवण्यासाठी ही उपकरणं उपयोगी ठरतील, असं ॲपलचं व्हिजन होतं.
55
प्रेरणा देणारं डिझाइन
'i' चा पाचवा अर्थ आहे 'इन्स्पायर' म्हणजेच प्रेरणा देणे. जे काहीतरी नवीन, क्रिएटिव्ह करू इच्छितात, त्यांच्यासाठी ॲपलची उत्पादनं प्रेरणास्थान बनावीत, अशी कंपनीची इच्छा होती. ॲपलचं आकर्षक डिझाइन आणि सोपा इंटरफेस वापरकर्त्यांना नवीन गोष्टी शोधण्यासाठी आणि क्रिएटिव्ह विचार करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories