Kisan Credit Card Scheme : केवळ 4% व्याजदराने 5 लाखांचे कर्ज!, ‘ही’ सरकारी योजना जाणून घ्या

Published : Jul 19, 2025, 06:22 PM IST
Kisan Credit Card

सार

केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता फक्त 4% व्याजदराने 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज अल्पकालीन शेती कर्ज, पशुपालन, बियाणे खरेदी आणि शेतीच्या दुरुस्तीसाठी वापरता येते.

मुंबई : शेतीसाठी किफायतशीर दराने कर्जाची गरज असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या ‘किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजने’अंतर्गत आता फक्त 4% व्याजदराने 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते! यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांपासून ते पशुपालन, बियाणे खरेदी आणि शेतीच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चापर्यंत अनेक गरजांवर हा पर्याय फायदेशीर ठरतो आहे.

KCC म्हणजे काय?

‘किसान क्रेडिट कार्ड’ योजना ही शेतकऱ्यांना अल्पकालीन शेती कर्ज देण्यासाठी 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. हे कार्ड केवळ कर्जपुरवठा न करता, ATM डेबिट कार्डप्रमाणे व्यवहार करण्याची सुविधाही देते. बँक मित्र, पीओएस मशीन किंवा मोबाइल अॅपद्वारेही शेतकरी व्यवहार करू शकतात.

कर्जाचे फायदे कसे मिळतात?

या योजनेत सरकारकडून 2% व्याज अनुदान आणि 3% वेळेवर परतफेड बोनस दिला जातो. यामुळे कर्जाचा शुद्ध व्याजदर फक्त 4% राहतो. जो देशातील सर्वात कमी व्याजदरांपैकी एक आहे.

वाढती गरज आणि वापर

सरकारी आकडेवारीनुसार, भारतात सध्या ७.७५ कोटींहून अधिक KCC खाती सक्रिय आहेत. २०१४ मध्ये KCC अंतर्गत कर्जरकमेचा आकडा ४.२६ लाख कोटी रुपये होता, जो २०२४ अखेर १०.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हे योजनेच्या यशाचे आणि गरजेचे स्पष्ट निदर्शक आहे.

कर्ज मर्यादा किती?

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 च्या अर्थसंकल्पात KCC अंतर्गत कमाल कर्ज मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली आहे.

2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे तारणमुक्त आहे.

2 लाखांहून अधिक रकमेवर बँकेच्या धोरणानुसार तारण किंवा हमीपत्रक आवश्यक असते.

कर्जाचे स्वरूप

बँका KCC कर्जाचे दोन भागात वर्गीकरण करतात.

अल्पकालीन कर्ज – बियाणे, खते, मजुरी, शेतीचा खर्च इ.

मुदत कर्ज – ट्रॅक्टर, सिंचन व्यवस्था, पशुपालन इ.

यामुळे बँकिंग व्यवहार सुटसुटीत होतात, तसेच शेतकऱ्यालाही खर्चाचे नियोजन करता येते.

KCC कार्ड वापर कसे कराल?

KCC हे कार्ड एटीएम, बँक मित्र, पीओएस मशीन, मोबाइल अ‍ॅप आणि आधार आधारित व्यवहार यासाठी वापरता येते. त्यामुळे बँकेत चकरा मारण्याची गरज न पडता, शेतकरी थेट बाजारात जाऊन व्यवहार करू शकतात.

अर्ज कोण करू शकतो?

जमीनधारक शेतकरी (वैयक्तिक वा संयुक्त)

भाडेकरू, शेअरक्रॉपर शेतकरी

स्वयंसहायता गट / संयुक्त दायित्व गट

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

निवडलेल्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा

"Kisan Credit Card" पर्याय निवडा

अर्ज भरा, सबमिट करा

बँकेकडून ३–४ दिवसांत संपर्क

ऑफलाइन अर्जासाठी, जवळच्या बँकेत जाऊन फॉर्म भरणे आणि आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

भरलेला अर्ज

ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार, ड्रायव्हिंग लायसन्स)

जमीनधारकतेचा पुरावा

शेती पद्धतीचे वर्णन

पासपोर्ट साइज फोटो

₹1.60 लाखांहून अधिक कर्जासाठी हमीपत्रक/तारण कागदपत्र

किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी सशक्त आणि विश्वासार्ह आर्थिक मदत करणारी योजना आहे. फक्त 4% व्याजदराने मिळणारे कर्ज हे शेतीच्या व्यावसायिकतेत बदल घडवणारे ठरू शकते. जर तुम्ही पात्र असाल, तर या योजनेचा लाभ घ्या आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त व्हा!

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

डायबिटिसला चुटकीत लावा पळवून, या भाजीचं लोणचं बनवा १५ मिनिटात
Kia च्या नवीन 'व्हिजन मेटा टुरिस्मो' कॉन्सेप्टचा टीझर रिलीज, हा स्टिंगरचा इलेक्ट्रिक उत्तराधिकारी?