Jio recharge plans : जिओने दोन नवीन 'व्हॉइस-ओन्ली' प्रीपेड प्लॅन्स आणले आहेत. ज्यांना डेटाची गरज नाही, अशा युजर्ससाठी हे प्लॅन्स आहेत. यात 84 दिवस आणि 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि SMS चे फायदे मिळतात.
आजकाल मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेकांना मोबाईल बिलावर मोठा खर्च करावा लागतो. विशेषतः डेटा वापरत नसतानाही त्याचे पैसे द्यावे लागतात. याच पार्श्वभूमीवर, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) काही दिवसांपूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांना विशेष आदेश दिले होते.
त्यात, जे युजर्स डेटा वापरत नाहीत आणि ज्यांना फक्त कॉलिंग आणि SMS ची गरज आहे, त्यांच्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन आणण्यास सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर, जिओने दोन नवीन 'व्हॉइस-ओन्ली' प्रीपेड प्लॅन्सची घोषणा केली आहे.
25
डेटा न वापरणाऱ्यांसाठी मोठी संधी
जिओचे नवीन प्लॅन्स खासकरून ज्यांना डेटाची गरज नाही त्यांच्यासाठी एक उत्तम संधी आहे. जे युजर्स फक्त कॉलिंग आणि SMS चा जास्त वापर करतात, त्यांच्यासाठी ही नवीन घोषणा खूप फायदेशीर ठरेल. तसेच, दीर्घकाळ व्हॅलिडिटी असल्यामुळे युजर्सना वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.
35
दिवसाला फक्त ५ रुपयांचा खर्च
या नवीन प्लॅनमध्ये युजर्सना 84 दिवसांची सेवा मिळते.
सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स मिळतात.
1000 मोफत SMS मिळतात.
याशिवाय, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही सारख्या ॲप्सचा मोफत ॲक्सेस मिळतो.
या प्लॅनमध्ये एकूण 365 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. यामुळे दिवसाला फक्त 5 रुपये खर्च येतो.
जिओ सिनेमा, जिओ टीव्ही ॲप्सचा मोफत ॲक्सेस देखील मिळतो. जे वर्षभरासाठी एकदाच रिचार्ज करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
55
लहान मुले, ज्येष्ठांसाठी उत्तम संधी
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक ज्यांचा डेटा वापर कमी आहे आणि जे फक्त कॉलिंग आणि SMS साठी फोन वापरतात, त्यांच्यासाठी हे प्लॅन्स खूप उपयुक्त ठरतील. ज्यांना इंटरनेटची गरज नाही, त्यांच्यासाठी हे प्लॅन्स स्वस्त आणि सोयीस्कर आहेत. तसेच, ज्यांना फक्त सिम ॲक्टिव्ह ठेवायचे आहे, त्यांच्यासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे.