JioSilver Digital Investment : जिओची नवी ऑफर, आता फक्त १० रुपयांत करा चांदीत गुंतवणूक

Published : Oct 02, 2026, 04:16 PM IST
JioSilver Digital Investment : जिओची नवी ऑफर, आता फक्त १० रुपयांत करा चांदीत गुंतवणूक

सार

मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्सने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. आता तुम्ही फक्त १० रुपये गुंतवून डिजिटल चांदी खरेदी करू शकता. सर्वसामान्यांना गुंतवणुकीची ही एक उत्तम संधी आहे.

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ कंपनी आता आपला व्यवसाय आणखी वाढवत आहे. जिओ फायनान्सने आता 'जिओ सिल्व्हर' (Jio Silver) लाँच केलंय. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना फक्त १० रुपयांत ९९.९ टक्के शुद्ध डिजिटल चांदीत गुंतवणूक करता येणार आहे. सर्वसामान्यांना चांदीत गुंतवणूक करून आपली आर्थिक सुरक्षितता वाढवण्याची ही एक भारी संधी जिओ फायनान्सने दिली आहे.

चांदीत गुंतवणुकीचे खास फीचर्स

जिओ फायनान्स ॲपवरून कर्ज, विमा, गुंतवणूक आणि पेमेंट अशा अनेक सुविधा देणाऱ्या 'जिओ फायनान्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिसेस लिमिटेड' (JFPSL) ने आता 'जिओ सिल्व्हर' ही नवी सेवा सुरू केली आहे. या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही अगदी १० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतची डिजिटल चांदी एकदम सोप्या पद्धतीने खरेदी करू शकता.

सिल्व्हर गुंतवणुकीचे इतर फायदे

तुम्ही थेट मार्केटच्या चालू दराने चांदीची खरेदी-विक्री करू शकता. चांदी विकल्यावर पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. याशिवाय, आठवड्याला किंवा महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्यासाठी 'एसआयपी' (SIP) चा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्ही जमा केलेली डिजिटल चांदी हवी असल्यास, प्रमाणित चांदीच्या नाण्यांच्या स्वरूपात थेट घरपोच मागवू शकता. 'जिओ सिल्व्हर' डॅशबोर्डवर तुम्हाला चांदीचे लाईव्ह दर, तुमची गुंतवणूक आणि व्यवहारांची सगळी माहिती सहज पाहता येते.

या चांदीची शुद्धता NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये काटेकोरपणे तपासली जाते. विशेष म्हणजे, प्रत्येक खरेदीवर तुम्हाला 'जिओ पॉईंट्स' मिळतील. हे पॉईंट्स वापरून तुम्ही ब्रँड वाउचर्स आणि शॉपिंगवर डिस्काउंट मिळवू शकता.

सोनं आणि चांदीसारखे मौल्यवान धातू गुंतवणुकीला नेहमीच बळकटी देतात. पूर्वी लोक फक्त प्रत्यक्ष स्वरूपात चांदी साठवून ठेवायचे. पण, जिओ सिल्व्हरने आता याला एक सुरक्षित आणि अतिशय सोपी डिजिटल संपत्ती बनवलं आहे, असं जिओ फायनान्स प्लॅटफॉर्मच्या सीईओ सुरभी एस. शर्मा यांनी सांगितलं. 'डिजिटल गोल्ड' सेवा यशस्वीपणे दिल्यानंतर, आता 'जिओ सिल्व्हर'च्या माध्यमातून कंपनीने गुंतवणूकदारांना आणखी एक उत्तम पर्याय दिला आहे.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Purple Potato: कुफरी जामुनिया! देशातील कुपोषण संपवण्यासाठी आलाय 'पर्पल बटाटा'
SBI Credit Card: एसबीआय क्रेडिट कार्ड वापरताय? 1 डिसेंबरपासून या व्यवहारांवर लागणार एक्स्ट्रा चार्ज