iQOO 13 स्मार्टफोन धमाकेदार प्रोसेसरसोबत भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स

Published : Dec 03, 2024, 01:15 PM ISTUpdated : Dec 03, 2024, 01:16 PM IST
iQOO 13 Smartphone Launched in India

सार

भारतात आयक्यू कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन iQOO 13 अखेर लाँच झाला आहे. हा फोन काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लाँच झाला होता. जाणून घेऊया स्मार्टफोनच्या धमाकेदार फीचर्सबद्दल सविस्तर...

iQOO 13 Smartphone Launched in India :  स्मार्टफोन तयार करणारी कंपनी वीवोचा सब-ब्रँड आयक्यूकडून आपला बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन iQOO 13 अखेर भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिल्याने फोनचा परफॉर्मेन्स वाढवण्यास मदत होणार आहे. याशिवाय फोनमध्ये एमोलेड डिस्प्ले दिलाय. आयक्यू कंपनीचा नवा स्मार्टफोन Realme GT 7 Pro सारख्या स्मार्टफोनला टक्कर देऊ शकतो.

आयक्यूमधील फीचर्स

iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 2K AMOLED डिस्प्ले दिला आहे. याशिवाय डिस्प्ले 144HZ च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार असून कंपनीने फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला आहे. यामुळे गेमिंगचा अनुभव उत्तम मिळणार आहे.

 

 

फोनमधील कॅमेऱ्याचे फीचर्स

फोनमधील कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास iQOO 13 मध्ये 50 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि एक 50 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. सेल्फी-व्हिडीओ कॉलसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी डिवाइसमध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी दिली असून फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. डिवाइसमध्ये Monster Halo ची लाइट दिली असून कॉल किंवा मेसेज आल्यावर पेटली जाते.

Realme GT 7 Pro ला मिळणार टक्कर

iQOO 13 स्मार्टफोन रिअलमीच्या नुकत्याच लाँच झालेल्या GT 7 Pro फोनला टक्कर देणारा ठरणार आहे. रिअलमीच्या फोनमध्ये 6.78 इंचाचा 8T LPTO Samsung Eco 1.5K OLED पंच होल स्क्रिन दिली आहे. याच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 Hz आणि पीक ब्राइटनेस 6500 निट्स आहेत. फोनच्या डिस्प्लेमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी दिली आहे.

आणखी वाचा : 

Google Storage वाढवण्यासाठी खास ट्रिक, पैसेही खर्च करावे लागणार नाही

पोस्ट ऑफिस एफडी: गुंतवणूक करून मिळवा चांगला परतावा

PREV

Recommended Stories

सासूबाईंना अॅडजस्टेबल पैन्जन द्या गिफ्ट, पाहून म्हणतील सुनबाई माझी गुणांची गं!
मोठी बातमी! रेपो रेट घटला! पण तुमचा Home Loan EMI नेमका किती रुपयांनी कमी होणार? ही आकडेवारी तुम्हाला आनंद देईल!