iPhone: फोनच्या कॅमेऱ्याने कोणी काय करतं? हा काय प्रश्न आहे, तुम्ही म्हणाल फोटो काढतात. पण तुम्हाला माहित आहे का की आयफोनचा कॅमेरा फक्त फोटो काढण्यासाठीच नाही, तर इतर अनेक कामांसाठीही वापरता येतो.
बहुतेक लोकांना वाटतं की आयफोनचा कॅमेरा फक्त चांगले फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी असतो. पण खरं तर, हा कॅमेरा दैनंदिन जीवनात अनेक उपयुक्त कामंही करतो. ॲपल दरवर्षी कॅमेरा फीचर्स अपडेट करत असतं. त्यामुळे आता आयफोनचा कॅमेरा एक मल्टी-टूल बनला आहे.
25
कॅमेऱ्याने वस्तूंची लांबी मोजता येते
आयफोनमध्ये आधीपासून असलेल्या Measure App च्या मदतीने कोणत्याही वस्तूची लांबी-रुंदी मोजता येते. भिंत, टेबल, दरवाजा यांसारख्या गोष्टी मोजण्यासाठी टेपची गरज नाही. ॲप उघडून कॅमेरा वस्तूच्या दिशेने धरा. स्क्रीनवर दिसणाऱ्या प्लस (+) चिन्हावर टॅप केल्यास लगेच माप दिसतं.
35
बोर्ड, पुस्तकातून मजकूर कॉपी करता येतो
रस्त्यावरील बोर्ड, पुस्तकाचे पान किंवा डॉक्युमेंटमधील मजकूर टाइप करण्याची गरज नाही. कॅमेरा मजकुराकडे धरताच स्क्रीनवर एक लहान टेक्स्ट आयकॉन दिसतो. त्यावर टॅप केल्यास तो मजकूर कॉपी करण्याचा पर्याय मिळतो. फोन नंबर सेव्ह करणे, नोट्स घेणे खूप सोपे होते.
आयफोनचा कॅमेरा स्कॅनरप्रमाणेही काम करतो. महत्त्वाचे डॉक्युमेंट PDF फाईलमध्ये बदलता येते. Files App उघडून तीन डॉट्स मेन्यू निवडा. तिथे Scan Document हा पर्याय असतो. कॅमेऱ्याने डॉक्युमेंटचा फोटो काढल्यावर तो PDF म्हणून सेव्ह होतो. ऑफिसच्या कामासाठी हे खूप उपयुक्त आहे.
55
हस्तलिखिताला डिजिटल नोट्समध्ये बदला
नोटबुकमध्ये लिहिलेल्या गोष्टीही आयफोन कॅमेऱ्याने स्कॅन करून मजकुरात बदलता येतात. नंतर तो मेसेज म्हणून पाठवता येतो किंवा नोट्स ॲपमध्ये सेव्ह करता येतो. अभ्यास आणि नोकरीच्या कामासाठी हे खूप मदत करते.