Indias Top 5 Billionaires : भारताच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या 2025 च्या यादीत मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्या नावांचा समावेश आहे. जाणून घ्या, या अब्जाधीशांनी मेहनत, शिक्षण आणि स्मार्ट विचारांनी प्रचंड संपत्ती कशी कमावली. त्यांचा यशस्वी प्रवास.
भारतातील टॉप 5 श्रीमंत व्यक्ती आणि त्यांची सक्सेस स्टोरी
भारतात दरवर्षी अब्जाधीशांची यादी बदलते, पण काही नावं कायम टॉपवर आहेत. 2025 मध्येही तेच दिग्गज श्रीमंतांच्या यादीत आहेत, ज्यांनी मेहनतीने व्यवसायात यश मिळवलं. जाणून घ्या कोण आहेत हे टॉप 5 अब्जाधीश.
26
मुकेश अंबानी: 119.5 अब्ज डॉलर्स संपत्तीसह नंबर 1
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 119.5 अब्ज डॉलर्स आहे. त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग आणि एमबीएचे शिक्षण घेतले आहे.
36
गौतम अदानी: शिक्षण सोडलं, पण उभी केली 220 अब्ज डॉलर्सची कंपनी
भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी आहेत. कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांनी शिक्षण सोडून व्यवसाय सुरू केला. आज त्यांची संपत्ती सुमारे 220 अब्ज डॉलर्स आहे.
सावित्री जिंदाल: भारतातील सर्वात श्रीमंत महिला, ज्या कधी कॉलेजला गेल्या नाहीत
जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. 40 अब्ज डॉलर्स संपत्तीसह त्या तिसऱ्या श्रीमंत व्यक्ती आहेत. विशेष म्हणजे, त्या कधी कॉलेजला गेल्या नाहीत.
56
शिव नाडर: शिक्षणापासून टेक्नोलॉजीपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात आदर्श
HCL ग्रुपचे संस्थापक शिव नाडर यांनी शिक्षणाच्या जोरावर यश मिळवले. इंजिनिअरिंगनंतर नोकरी सोडून कॉम्प्युटर व्यवसाय सुरू केला. आज त्यांची संपत्ती 31.6 अब्ज डॉलर्स आहे.
सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक दिलीप सांघवी यांनी वडिलांच्या दुकानातून करिअर सुरू केले. आज त्यांची कंपनी जगातील टॉप फार्मा कंपन्यांपैकी एक असून त्यांची संपत्ती 24 अब्ज डॉलर्स आहे.