Zoho Arattai: एक जबरदस्त फीचर जे WhatsApp 2025 मध्येही देऊ शकलेलं नाही!, जाणून घ्या सविस्तर माहिती

Published : Oct 04, 2025, 07:46 PM IST

Zoho Arattai: Zoho Arattai हे एक यशस्वी भारतीय मेसेजिंग अ‍ॅप आहे, जे कमी इंटरनेट स्पीड आणि बजेट स्मार्टफोनसाठी बनवले. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे Android TV अ‍ॅप, जे WhatsApp मध्येही उपलब्ध नाही.

PREV
16
Zoho Arattai हे भारतीय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप

Zoho Arattai: भारतात तयार झालेलं Zoho Arattai हे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप सध्या प्रचंड यशाच्या शिखरावर आहे. Arattai ने App Store वर टॉप रँक मिळवला असून, Google Play Store वर सर्वाधिक डाऊनलोड होणारं मेसेजिंग अ‍ॅप ठरलं आहे. या यशामागचं कारण? एक असं फीचर जे WhatsApp कडेही आज नाही! 

26
Arattai म्हणजे काय?

Arattai हे Zoho कंपनीचं मेड-इन-इंडिया मेसेजिंग अ‍ॅप आहे. Zoho चे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी हे अ‍ॅप खास करून अशा वापरकर्त्यांसाठी तयार केलं आहे, जे स्लो इंटरनेट वापरतात किंवा लो-एंड स्मार्टफोनवर काम करतात. वेंबू यांचं स्वप्न आहे एक असं तंत्रज्ञान देणं जे प्रत्येक भारतीयाच्या हातात पोहोचेल, मग तो शहरात असो किंवा ग्रामीण भागात. 

36
WhatsApp पेक्षा Arattai कसं वेगळं?

Arattai मध्ये एक अशी सुविधा आहे जी WhatsApp कडे 2025 पर्यंतही उपलब्ध नाही आणि ती म्हणजे Android TV अ‍ॅपची सुविधा. होय! Zoho ने Arattai चं Android TV वर्जन लॉन्च केलं असून, युजर्स आता त्यांच्या TV वरूनही मेसेजिंग करू शकतात. WhatsApp अजूनही ही सुविधा देऊ शकलेलं नाही. 

46
Arattai चे खास वैशिष्ट्ये

Low Bandwidth Support

कमकुवत किंवा स्लो इंटरनेट असतानाही अ‍ॅप उत्तम चालतं.

हलकं डिझाईन

कमी स्टोरेज आणि रॅम असलेल्या फोनवर देखील अ‍ॅप सहज चालतं.

जलद आणि स्मूथ अनुभव

मेसेजिंग, कॉलिंग, फाइल शेअरिंगसारख्या सुविधा जलद आणि अडथळेविना वापरता येतात.

Android TV अ‍ॅप

टीव्हीवरूनही आता Arattai वापरता येणार WhatsApp पेक्षा एक पाऊल पुढे! 

56
Arattai का महत्त्वाचं ठरतंय?

भारतात आणि इतर विकसनशील देशांमध्ये अजूनही अनेक वापरकर्ते बजेट स्मार्टफोन आणि मर्यादित डेटा वापरतात. अशा परिस्थितीत Telegram किंवा WhatsApp सारखी अ‍ॅप्स वापरणं कठीण होतं. Arattai या अडचणी लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. वेंबू यांचं म्हणणं आहे की, “तंत्रज्ञान सर्वांसाठी असायला हवं. आणि Arattai हे त्याच दिशेनं एक पाऊल आहे.” 

66
भविष्यातील योजना

जसं जसं ग्रामीण व उपनगरांमधील लोक ऑनलाइन येत आहेत, तसं लो बँडविड्थ अ‍ॅप्सची मागणी वाढत आहे. Zoho चं Arattai या गरजेला पूर्ण करणारा पर्याय ठरू शकतो.

Zoho ला केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक टेक क्षेत्रात एक नावीन्यपूर्ण कंपनी म्हणून स्थान मिळवायचं आहे, आणि Arattai हे त्याच दिशेने एक मोठं पाऊल आहे. 

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories