Indian Railways Rules : ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात रिल्स बघताय? सावधान! होऊ शकते शिक्षा

Published : Nov 04, 2026, 08:54 AM IST
Indian Railways Rules : ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात रिल्स बघताय? सावधान! होऊ शकते शिक्षा

सार

ट्रेनमध्ये प्रवास करताना मोठ्या आवाजात रिल्स किंवा व्हिडिओ बघणाऱ्यांवर आता रेल्वेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सहप्रवाशांना त्रास दिल्यास टीसी तुम्हाला दंड ठोठावू शकतो किंवा ट्रेनमधून खालीही उतरवू शकतो. वारंवार हा नियम मोडल्यास ५ हजार रुपयांचा दंड आणि ६ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

मुंबई : भारतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश लोक ट्रेनवरच अवलंबून असतात. तिकीट स्वस्त असतं आणि प्रवासही सुरक्षित आणि वेळेत होतो. त्यामुळे अनेक जण ट्रेनने प्रवास करणं पसंत करतात. पण, काही प्रवाशांच्या वागण्यामुळे हल्ली अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

आजकाल ट्रेनमध्ये एकटं प्रवास करताना कंटाळा येणं साहजिक आहे. यावर उपाय म्हणून लोक मोबाईलचा आधार घेतात. अनेक जण प्रवासात मोबाईलवर रिल्स बघतात, तर काही जण सिनेमे पाहतात. पण आता प्रशासनाने यावर कडक पावलं उचलली आहेत. ट्रेनमध्ये आता मनमानी पद्धतीने मोबाईल वापरता येणार नाही.

तुम्ही मोठ्या आवाजात रिल्स किंवा व्हिडिओ बघत असाल आणि त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होत असेल, तर तुम्हाला ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. सोबतच जास्तीत जास्त ६ महिन्यांची जेलही होऊ शकते. 'सदर्न रेल्वे'ने (Southern Railway) त्यांच्या विविध विभागांना हे निर्देश दिले आहेत. तशी नोटीस सुद्धा काढण्यात आली आहे. त्यामुळे आता ट्रेनमध्ये प्रवास करताना काळजी घ्या, नाहीतर ५ हजार रुपये खिशातून जातील.

आता ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात मोबाईल वाजवल्यास तिकीट तपासनीस (TTE) तुमच्याकडून दंड वसूल करेल. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याचं स्वरूप आणि परिस्थिती बघून टीसी कारवाई करेल. सुरुवातीला एक हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. एवढंच नाही, तर प्रवाशाला ट्रेनमधून खाली उतरवण्याचा अधिकारही टीसीला असेल.

जर एखाद्याने वारंवार हीच चूक केली, तर त्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. सोबतच ६ महिन्यांची जेलही होऊ शकते. भारतीय रेल्वेने नुकतीच ही माहिती दिली असून तशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. खरं तर, प्रवासात अनेक जण मोबाईलवर रिल्स किंवा सिनेमे बघतात. पण मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांना त्याचा खूप त्रास होतो. सर्व प्रवाशांच्या सोयीचा विचार करून प्रशासनाने हा नवीन नियम आणला आहे. त्यामुळे आता ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात रिल्स किंवा सिनेमे बघता येणार नाहीत.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Jio Recharge Plans : जिओचे नवीन स्वस्त प्लॅन्स, फक्त कॉलिंगसाठी; डेटाची गरज नाही!
First Mobile Phone : जगातील पहिला मोबाईल कसा होता? किंमत आणि वजन ऐकून थक्क व्हाल!