मोबाइल रीचार्जसाठी गुगल पे आकारतेय सुविधा शुल्क?

Published : May 05, 2025, 05:00 PM IST
मोबाइल रीचार्जसाठी गुगल पे आकारतेय सुविधा शुल्क?

सार

मोबाइल रीचार्ज: गुगल पे सारख्या झटपट पेमेंट अ‍ॅपचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंटसाठी केला जातो. पण तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून मोबाइलचा रीचार्ज करता का? तर आधी ही बातमी संपूर्ण नक्की वाचा...

मोबाइल रीचार्जवरील सुविधा शुल्क: तुम्ही झटपट पेमेंट अ‍ॅप गुगल पे च्या माध्यमातून मोबाइल रीचार्ज करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, गुगल पे ने युपीआय (UPI)च्या माध्यमातून मोबाइल रीचार्जसाठी वापरकर्त्यांकडून सुविधा शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत कंपनीकडून तीन रूपयांपर्यंतचा सुविधा शुल्क वसूल केला जाणार आहे.

 हा शुल्क अशा वापरकर्त्यांसाठी लागू असणार आहे जे गुगल पे च्या माध्यमातून मोबाइलसाठी प्रीपेड प्लॅन (मोबाइल प्रीपेड प्लॅन) रीचार्ज करतात. यापूर्वी गुगल पे च्या माध्यमातून मोबाइल रिचार्ज करताना कोणताही शुल्क आकारला जायचा नाही. वापरकर्त्यांना केवळ टेलीकॉम ऑपरेटरकडून घेतल्या जाणाऱ्या पैशांचे पेमेंट करावे लागत होते.

सुविधा शुल्क खरंच द्यावा लागतोय?
इंस्टाग्रामवरील अकाउंट Techy_Marathi जे तंत्रज्ञानाबद्दलची वेगवेगळी माहिती देतात. त्यांनी, गुगल पे सारख्या अन्य झटपट पेमेंट अ‍ॅपच्या (झटपट पेमेंट अ‍ॅप) माध्यमातूनही सुविधा शुल्क घेत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेय की, तुम्ही ऑनलाइन पेमेंट करताना गुगल पे चा वापर करता का? कारण गुगल पे कडून मोबाइल रीचार्जसाठी सुविधा शुल्क घेत आहे. हा सुविधा शुल्क तुमच्या रीचार्जच्या किमतीवर अवलंबून आहे. तो एक ते तीन रूपयांपर्यंत असू शकतो.

आता काय करायचं? असा प्रश्न पडला असल्यास फोन पे (फोन पे), पेटीएम (पेटीएम) सारख्या झटपट पेमेंट अ‍ॅपवरून मोबाइल रीचार्ज करण्याचा विचार कराल. पण येथे सुद्धा आधीपासूनच सुविधा शुल्क घेतला जात आहे. यामुळे सुविधा शुल्क द्यावा लागू नये म्हणून तुम्ही जिओ (JIO), व्होडाफोन-आयडिया (व्होडाफोन-आयडिया), एअरटेल (एअरटेल) सारख्या सिम कार्ड कंपन्यांच्या डिफॉल्ट अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाइल रीचार्ज करू शकता. येथे सुविधा शुल्क आकारला जात नाही.

व्हिडीओ: गुगल पे वरून रिचार्च करताय? हा व्हिडीओ संपूर्ण पाहा

याशिवाय झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही १०० रूपयांचा रिचार्ज गुगल पे च्या माध्यमातून करत असल्यास कोणत्याही प्रकारचा सुविधा शुल्क आकारला जाणार नाही. पण १०० ते २०० रूपयांवर २ रूपये, ३०० रूपये ते त्यापेक्षा अधिक किमतीच्या मोबाइल रीचार्जवर सुविधा शुल्क ३ रूपये घेतला जाणार आहे.

PREV

Recommended Stories

Pandharpur–Tirupati Railway : पंढरपूर ते तिरुपती, थेट दर्शनासाठी विशेष रेल्वे! संपूर्ण वेळापत्रक लगेच पाहा!
दमदार Toyota Hilux ला 5 स्टार सेफ्टी रेटिंग, वाचा पिक-अप ट्रकचा 89 टक्के स्कोअर कसा आला!