Indian Railway Gold Rules : सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे ट्रेनमधून प्रवास करताना किती सोनं सोबत नेता येईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारतीय रेल्वेमध्ये सोनं घेऊन जाण्याचे नियम सामानाच्या नियमांनुसारच आहेत.
दिवसागणीक सोन्याचे भाव वाढताना दिसून येत आहे. सोने लवकरच दीड लाखांचा टप्पा ओलांडेल असे सांगितले जात आहे. पण सणासुदीला सोने खरेदी करावेच लागते, तसेच ते घातलेही जाते. भारतीय रेल्वे सोन्याला विशेष वस्तू मानत नाही, तर ते सामान (लगेज) म्हणूनच गणले जाते.
सोने खरेदीची पावती सोबत ठेवावी का…वाचा..
26
प्रत्येक क्लाससाठी सामानाची मर्यादा
तुम्ही तुमच्या तिकिटावरील लगेज मर्यादेत सोनं नेऊ शकता. प्रत्येक क्लाससाठी वेगळी मर्यादा आहे: फर्स्ट एसी-70kg, एसी 2-टियर-50kg, एसी 3-टियर/स्लीपर-40kg, सेकंड क्लास-35kg.
36
सोनं सोबत नेताना पावती गरजेची?
RBI च्या नियमांनुसार, वैयक्तिक वापरासाठीच्या सोन्यावर मर्यादा नाही. पण खरेदीची पावती सोबत ठेवल्यास कर आणि पोलीस चौकशीचा त्रास टाळता येतो. यामुळे तुमचा प्रवास सोपा होतो.
सोन्याचे भाव वाढल्याने चोरीचा धोका वाढला आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये सोनं नेताना काळजी घ्या. सोनं नेहमी तुमच्या जवळच्या बॅगेत ठेवा. जास्त सोनं असेल तर ते विभागून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.
56
सुरक्षित प्रवासासाठी नियम पाळा
थोडक्यात, ट्रेनमध्ये सोनं घेऊन जाणं पूर्णपणे कायदेशीर आहे. पण ते तुमच्या सामानाच्या मर्यादेत असलं पाहिजे. तसेच, रेल्वेने सांगितलेल्या सुरक्षा नियमांचे पालन केल्यास तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
66
जबाबदारी महत्त्वाची
तुम्ही ट्रेनमध्ये सोने घेऊन जात असाल आणि ते चोरीला गेले तर रेल्वे विभाग त्याची जबाबदारी घेत नाही. त्याचा तपास केला जातो. सोने मिळाले तर तुम्हाला परतही केले जाते. पण त्याच्या भरवाईची हमी रेल्वे देत नाही.