भारतात कमी खर्चात आणि सुरक्षित लांबच्या प्रवासासाठी लोक ट्रेनलाच पसंती देतात. भारतीय रेल्वे हे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. रोज हजारो गाड्या धावतात आणि लाखो प्रवासी सुरक्षित प्रवास करतात. कुटुंबासोबत, विशेषतः लहान मुलांसोबत ट्रेनने प्रवास करताना रेल्वेचे तिकीट दर आणि सवलतींचे नियम माहिती असणं खूप गरजेचं आहे.
24
५ वर्षांखालील मुलांसाठी तिकीट फ्री
भारतीय रेल्वे पाच वर्षांखालील मुलांसोबत प्रवास करणाऱ्या पालकांना तिकिटात सूट देते.
मोफत प्रवास: जर मुलाला स्वतंत्र सीट किंवा बर्थ नको असेल, तर तुम्ही त्याला विनातिकीट सोबत नेऊ शकता. आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाईटवर तिकीट बुक करताना फक्त 'Add Infant without Berth' हा पर्याय निवडून मुलाची माहिती भरणं आवश्यक आहे.
स्वतंत्र बर्थ हवा असल्यास काय? जर तुम्हाला तुमच्या लहान मुलासाठी स्वतंत्र बर्थ हवा असेल, तर मात्र तुम्हाला मोठ्या माणसांप्रमाणे पूर्ण तिकीट काढावं लागेल.
34
५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी नियम
भारतीय रेल्वे पाच ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ट्रेन प्रवासात दोन पर्याय देते.
बर्थ नको असल्यास अर्धं तिकीट: जर मुलाला स्वतंत्र सीट किंवा बर्थ नको असेल, तर मोठ्या माणसांच्या तिकिटाच्या तुलनेत फक्त अर्धं तिकीट आकारलं जातं. अशा वेळी मुलांना पालकांसोबत सीट शेअर करून प्रवास करावा लागतो.
स्वतंत्र बर्थ हवा असल्यास पूर्ण तिकीट: लांबच्या प्रवासात मुलांना झोपण्यासाठी स्वतंत्र बर्थ हवा असेल, तर त्यासाठी मोठ्या माणसांप्रमाणे पूर्ण तिकीट काढावं लागतं.
रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासाच्या दिवशी १२ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्वांना प्रौढ (Adult) मानलं जातं.
यांना रिझर्व्हेशन आणि अनरिझर्व्हड अशा सर्वच डब्यांमध्ये पूर्ण तिकीट काढावं लागतं. एसी कोच (AC Coaches), सुपरफास्ट एक्सप्रेस (Superfast Express) आणि साध्या एक्सप्रेस गाड्या अशा सर्व प्रकारच्या ट्रेनसाठी हा वयाचा आणि तिकिटाचा नियम सारखाच आहे.
या गोष्टी नक्की लक्षात ठेवा:
वयाचा पुरावा: टीटीई (TTE) तिकीट तपासणीला आल्यावर कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून मुलांच्या वयाचा पुरावा (आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचं ओळखपत्र) सोबत ठेवणं केव्हाही चांगलं.
प्रवासाच्या वेळचं वय: तुम्ही तिकीट कधी बुक करताय यावर नाही, तर प्रत्यक्ष प्रवासाच्या दिवशी मुलाचं वय किती आहे, यावर हे नियम लागू होतात.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .