Indian Air Force Recruitment 2025 : भारतीय हवाई दलात अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी! अर्ज 11 जुलैपासून सुरू, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published : Jun 26, 2025, 07:55 PM IST
how to become an Indian Air Force fighter pilot

सार

भारतीय हवाई दलाच्या अग्निपथ योजनेअंतर्गत AGNIVEERVAYU INTAKE 02/2026 साठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. 11 जुलै 2025 पासून ऑनलाईन अर्ज करा आणि सुवर्णसंधी मिळवा. पात्रता, निवड प्रक्रिया, सॅलरी आणि अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Indian Air Force Recruitment 2025 : भारतीय हवाई दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे! अग्निपथ योजनेअंतर्गत AGNIVEERVAYU INTAKE 02/2026 साठी भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली असून, 11 जुलै 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करून ही सुवर्णसंधी मिळवावी.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू?

अर्ज सुरू होणार: 11 जुलै 2025

ऑनलाइन परीक्षा: 25 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाइट: agnipathvayu.cdac.in

पात्रता काय असावी?

वयोमर्यादा:

जन्म 1 जानेवारी 2005 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान असावा.

किमान वय: 17.5 वर्ष

कमाल वय: 21 वर्ष (सूटीसह बदल होऊ शकतो)

शैक्षणिक पात्रता:

12वी (Physics, Maths आणि English) – प्रत्येकी किमान 50% गुण

3 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Computer Science इ.) – किमान 50% गुण

2 वर्षांचा व्होकेशनल कोर्स – Physics, Maths विषय असणे आवश्यक. English मध्ये 50% गुण

निवड प्रक्रिया कशी होईल?

ऑनलाइन परीक्षा

फिजिकल फिटनेस टेस्ट (PST/PET)

कागदपत्र पडताळणी

वैद्यकीय तपासणी

निवड झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

सॅलरी आणि सेवा निधी किती मिळणार?

वर्ष  (दरमहा सॅलरी)

1 ₹30,000

2 ₹33,000

3 ₹36,500

4 ₹40,000

सेवा निधी: सुमारे ₹10.08 लाख (करमुक्त)

असा करा अर्ज:

agnipathvayu.cdac.in या वेबसाइटला भेट द्या.

“New Registration” लिंकवर क्लिक करा.

लॉगिन करून आवश्यक माहिती भरा.

फोटो, स्वाक्षरी अपलोड करा.

अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.

फॉर्मची प्रिंटआउट घेऊन ठेवा.

तुमचं स्वप्न पूर्ण करा, देशसेवा आणि करिअर एकाच वेळी!

भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू होणं म्हणजे फक्त नोकरी नाही, तर गौरव, साहस आणि देशसेवेचा संधीसंधान. पात्र उमेदवारांनी ही संधी नक्कीच सोडू नये.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! रेपो रेट घटला! पण तुमचा Home Loan EMI नेमका किती रुपयांनी कमी होणार? ही आकडेवारी तुम्हाला आनंद देईल!
स्वप्न पूर्ण करा! IndiGo मध्ये पायलट व्हायचंय? जाणून घ्या 'करोडो' रुपयांचे पॅकेज, सुविधा आणि नेमका पगार किती?