
मुंबई - सध्या WhatsApp माहित नाही असे सांगणारा माणूस महाराष्ट्रात तरी सापडणे कठीण आहे. दररोज गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेज WhatsApp वर पाठवणे दिनचर्येचा एक भाग झाला आहे. एकमेकांशी सतत संपर्कात राहण्यासाठी WhatsApp हे खूप महत्त्वाचे अॅप आहे. या अॅपमुळे संभाषण साधण्यासाठी दरवेळी फोन करायची गरज राहिलेली नाही. WhatsApp वर एक मेसेज टाकला की झाले.
लोकांचा वापर वाढत असताना WhatsApp ने आपल्या फीचर्समध्ये अनेक बदल केले आहेत. पूर्वी फक्त चॅटपुरते मर्यादित असलेले WhatsApp आता ऑडिओ कॉल, व्हिडिओ कॉल, ग्रुप कॉल, ग्रुप व्हिडिओ कॉल करण्यासोबतच व्यवसायासाठीही वापरता येते. WhatsApp वर स्टेटस हे सर्वाधिक वापरले जाणारे फीचर आहे. आता WhatsApp युजर्ससाठी कंपनीने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. तुमच्याकडे दोन मोबाईल आहेत, पण दोन्हीसाठी एकच WhatsApp नंबर वापरता येत नाही, अशी समस्या भेडसावत आहे. अशी वेळी WhatsApp साठी नवीन फोन नंबर घ्यावा लागतो. तर आता तुमची समस्या दूर होणार आहे.
दोन मोबाईलमध्ये एकच अकाउंट :
हो, तुमच्याकडे दोन मोबाईल आहेत. एका मोबाईलमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून WhatsApp अकाउंट उघडले आहे. दुसऱ्या मोबाईलमध्ये त्याच नंबरने WhatsApp उघडता येत नाही. पण आता कंपनीने तुम्हाला दोन्ही मोबाईलमध्ये एकच अकाउंट उघडण्याची सुविधा दिली आहे. एवढेच नव्हे तर एकाच वेळी तुम्ही चार डिव्हाइसमध्ये WhatsApp उघडू शकता.
दोन फोनमध्ये एकच WhatsApp खाते कसे उघडायचे? :
• तुमच्या दुसऱ्या मोबाईलच्या Google Play Store वर जाऊन WhatsApp डाउनलोड करा.
• Link to Existing Account हा पर्याय निवडा. तुम्हाला WhatsApp अॅप्लिकेशनच्या वेलकम स्क्रीनवरच हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. तिथे चुकूनही तुमचा मोबाईल नंबर टाईप करू नका.
• त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर QR कोड दिसेल. हा QR कोड स्कॅन करा. आधीच WhatsApp चालू असलेल्या फोनने तुम्ही स्कॅन करायचे आहे. त्याआधी एक-दोन गोष्टी करायच्या आहेत.
• पहिल्या फोनच्या WhatsApp सेटिंग्जमध्ये जा. तिथे Linked Devices या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर QR कोड स्कॅन करा.
असे केल्याने तुमच्या दोन्ही मोबाईलमध्ये WhatsApp सक्रिय होईल. सर्व चॅट्स, मेसेज, फोटो दोन्ही मोबाईलमध्ये तुम्हाला मिळतील.
जर QR कोड स्कॅन दिसत नसेल तर WhatsApp वेबद्वारे तुम्ही लॉगिन होऊ शकता. मल्टी-डिव्हाइस फीचर एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह येते. तुमचे वैयक्तिक चॅट आणि कॉल पूर्णपणे सुरक्षित राहतील.