Income Tips : ज्यांना कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा एक उत्तम पर्याय आहे. आता हीच सुविधा प्रसिद्ध फिनटेक कंपनी Amazon ने आणली आहे. ही सुविधा Amazon Pay वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Amazon Pay ने आपल्या आर्थिक सेवांचा विस्तार करत नवीन फिक्स्ड डिपॉझिट (FD) सुविधा सुरू केली आहे. आता Amazon ॲपद्वारे फक्त १००० रुपयांमध्ये FD सुरू करण्याची संधी मिळेल. या सुविधेसाठी Amazon Pay ने अनेक NBFC, स्मॉल फायनान्स बँका आणि एका मोठ्या बँकेसोबत भागीदारी केली आहे.
25
कोणत्या कंपन्यांसोबत भागीदारी?
Amazon Pay ही FD सेवा देण्यासाठी दोन प्रसिद्ध NBFC आणि पाच बँकांसोबत काम करत आहे.
NBFCs:
* श्रीराम फायनान्स
* बजाज फायनान्स
बँका:
* शिवालिक स्मॉल फायनान्स बँक
* सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
* उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
* साऊथ इंडियन बँक
* स्लाइस
या कंपन्यांमध्ये तुमचे खाते नसले तरी, तुम्ही Amazon Pay द्वारे थेट FD मध्ये गुंतवणूक करू शकता.
35
Amazon Pay FD ची वैशिष्ट्ये
Amazon Pay FD चे मुख्य आकर्षण म्हणजे यासाठी वेगळे बचत खाते उघडण्याची गरज नाही. युजर्स त्यांच्या आवडीची भागीदार कंपनी निवडून, हव्या त्या कालावधीसाठी FD सुरू करू शकतात. किमान गुंतवणुकीची रक्कम फक्त १००० रुपये आहे. ही सोय नवीन गुंतवणूकदारांसाठी खूप उपयुक्त आहे.