चुकीच्या खाण्याच्या सवयी, तणाव आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. निरोगी शरीरासाठी आतड्यांची स्वच्छता आवश्यक असून, एरंडेल तेल हा आतडे स्वच्छ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.
सकाळी उठल्यावर ५ मिनिटांत पोट होईल साफ, 'या' तेलाच्या वापरानं बद्धकोष्ठतेला करा बायबाय
खाण्याच्या सवयी चुकीच्या असल्या की आपल्या पचनसंस्थेवर त्याचा वाईट परिणाम व्हायला सुरुवात होते. ताणतणाव, अनियमित दिनचर्या आणि बाहेरचे अन्न वारंवार यामुळे शरीराची पचनशक्ती कमकुवत होऊन जात असते.
26
बद्धकोष्ठता एक सामान्य समस्या
बद्धकोष्ठता हि एक सामान्य समस्या सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य कमी खाल्याने आतडे आळशी होतात. त्यामुळं मल सहज बाहेर पडत नाही.
36
पचनक्रिया मंदावत जाते
जास्त वेळ बसून राहील आणि शारीरिक हालचाल न केल्यामुळं पचनक्रिया मंदावत जाते. जंक फूड, तेलकट पदार्थ आणि साखरेचे पदार्थदेखील नैसर्गिक आतड्यांच्या हालचालीत अडथळा निर्माण करत असतात.
बद्धकोष्ठता वाढण्यामागे अनेक कारण असून ताण, चिंता, झोपेचा अभाव आणि थायरॉईड आणि मधुमेहाच्या अडचणीमुळं बद्धकोष्ठता मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं.
56
निरोगी शरीर राखण्यासाठी आतड्यांची संपूर्ण स्वच्छता आवश्यक
निरोगी शरीर राखण्यासाठी आतड्यांची संपूर्ण स्वछता आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर २० मिनिटांमध्ये पोट साफ व्हायला हवं, अन्यथा त्याचे शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतात.
66
आतड्याच्या आजारावर एरंडेल तेल प्रभावी
आतड्याच्या आजारावर एरंडेल तेल हे प्रभावी उपाय आहे. आतडे स्वच्छ करण्यासाठी आणि आतील खराब पदार्थ बाहेर काढण्यासाठी खासकरून एरंडेल तेलाचा वापर केला जातो.