वेल्लूरजवळ व्यवसायातील तोट्यामुळे झालेल्या भांडणानंतर, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने विजेचा धक्का देऊन तिची हत्या केली. आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा बनाव रचला, पण पोलीस तपासात पती करुणाकरन अडकला.
दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे वेल्लूर. इथल्या पल्लीकोंडाजवळील कट्टूकोल्लाई गावातील करुणाकरन (43) याचे टायरचे दुकान आहे. त्याची पत्नी कलैअरसी (33) होती. 14 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. या जोडप्याला 3 मुले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायात तोटा झाल्यामुळे करुणाकरन घरीच होता. यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. तो दारू पिऊनही भांडण करायचा.
24
कलैअरसी झोपायला गेली आणि पुढे...
अशातच करुणाकरनला पत्नी कलैअरसीच्या चारित्र्यावर अचानक संशय येऊ लागला. 'माझ्याशिवाय तुझं दुसऱ्या कोणासोबत संबंध आहे का?' असे विचारून तो तिचा छळ करू लागला. यामुळे प्रचंड मानसिक तणावात असलेल्या करुणाकरनने पत्नीची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार, 30 डिसेंबरच्या रात्री कलैअरसी जेवण करून झोपायला गेली.
34
ऐकून धक्का बसलेले तिचे आई-वडील तिथे पोहोचले...
तेव्हा त्याने कलैअरसीला विजेचा धक्का देऊन तिची हत्या केली आणि सकाळी काहीही माहिती नसल्याचा आव आणत तिच्या वडिलांना फोन केला. 'तुमची मुलगी श्वास घेत नाहीये आणि काहीच हालचाल करत नाहीये,' असं करुणाकरनने सांगितले. हे ऐकून धक्का बसलेले तिचे आई-वडील तिथे पोहोचले, तेव्हा कलैअरसीचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. मुलीच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी पल्लीकोंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून करुणाकरनची कसून चौकशी केली.
चौकशीत करुणाकरनने कबूल केले की, पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने, गाढ झोपलेल्या कलैअरसीच्या हाता-पायांना वायरने विजेचा धक्का देऊन तिची हत्या केली. त्यानंतर सकाळी पत्नीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा बनाव तिच्या आई-वडिलांसमोर रचला. यानंतर पोलिसांनी करुणाकरनला अटक करून तुरुंगात टाकले.