
टोयोटो फॉर्च्युनर गाडीला मार्केटमध्ये अजून कोणी दमदार स्पर्धक नसल्याचं दिसून आलं आहे. पण आता ह्युंदाई कंपनी टस्सल देणारी कार मार्केटमध्ये आणण्याचा विचार करत असल्याचं दिसून आलं आहे. ह्युंदाईची नवीन पॅलिसेड हायब्रिड पुढील काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. ही कार आयात केली जाणार नसून ती भारतात तयार केली जाईल. त्यामुळे तिची किंमत फॉर्च्युनरच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.
ह्युंदाईची नवीन पॅलिसेड ही एक मोठी लक्झरी एसयूव्ही गाडी मार्केटमध्ये आली आहे. या गाडीमध्ये ३ सिटांची अरेंजमेंट करण्यात आली आहे. तिचा नवीन बोल्ड लूक अनेकांना आवडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ह्युंडाई पॅलिसेड भारतीय बाजारपेठेतील सर्वात महागडी एसयूव्ही बनणार आहे. ती ह्युंदाई टक्सनपेक्षा मोठी असण्याची शक्यता आहे, अगदी ह्युंदाईची सर्वात मोठी गाडी बनणार आहे. ₹५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या विभागात, ती टोयोटा फॉर्च्युनरची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी बनणार आहे. फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत ₹३३.६५ लाखांपासून सुरू होत असून ₹४८.८५ लाखांपर्यंत जात आहे.
ह्युंडाई पॅलिसेडमध्ये एक नवीन हायब्रिड सिस्टम असणार आहे, ज्यामध्ये मोठे टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन असेल. ही ह्युंदाई कार एका टँकमध्ये 1,000 किलोमीटरची रेंज देऊ शकते. नवीन हायब्रिड मॉडेल 14 किमी प्रति लिटर इंधन भेटणार आहे. नवीन पॅलिसेडमध्ये एक शक्तिशाली इंजिन, प्रीमियम वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञान असेल.
पॅलिसेडचे पेट्रोल 2.5-लिटर टी-जीडीआय हायब्रिड एका टँकवर 1,015 किलोमीटरची रेंज देऊ शकते. मोठे V6 पेट्रोल इंजिन देखील शक्य आहे, परंतु पॅलिसेडचा हा प्रकार भारतात येण्याची शक्यता कमी निर्माण झाली आहे