SIP Investment : दरमहा 1000 रुपये गुंतवून 35 लाख कसे मिळवायचे? मध्यमवर्गीयांसाठी बेस्ट प्लॅन

Published : Oct 21, 2026, 12:35 PM IST

दरमहा फक्त 1,000 रुपयांची SIP करून तुम्ही 35 लाख रुपये कसे कमवू शकता? 20 आणि 30 वर्षांत तुमचे पैसे कसे वेगाने वाढतात, याचं सोपं गणित आज आपण समजून घेणार आहोत.

PREV
15
सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा

थोड्या थोड्या पैशांची बचत भविष्यात मोठी आर्थिक सुरक्षा देते, हे SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) ने सिद्ध केलंय. शेअर बाजारावर आधारित म्युच्युअल फंड्समध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास सरासरी 12% वार्षिक परतावा मिळतो. तुमचे पैसे कसे वाढतात?

25
500 रुपयांच्या गुंतवणुकीची 20 आणि 30 वर्षांतील जादू

तुम्ही दरमहा 500 रुपये गुंतवता, तेव्हा दिवसाला फक्त 17 रुपये बाजूला काढता. सलग 20 वर्षे ही गुंतवणूक केल्यास तुमची एकूण रक्कम 1,20,000 रुपये होते. यावर 12% चक्रवाढ व्याजाने 3,80,000 रुपये नफा मिळतो. म्हणजेच 20 वर्षांनंतर तुमच्या हातात 5,00,000 रुपये येतात.

हीच 500 रुपयांची गुंतवणूक तुम्ही आणखी 10 वर्षे (एकूण 30 वर्षे) चालू ठेवली, तर तुमची एकूण गुंतवणूक 1,80,000 रुपये होते. पण चक्रवाढ व्याजाच्या जादूमुळे तुम्हाला तब्बल 15,85,000 रुपये नफा मिळतो. 30 वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम 17,65,000 रुपयांपर्यंत पोहोचते.

35
1,000 रुपयांच्या गुंतवणुकीची 20 आणि 30 वर्षांतील वाढ

दरमहा 1,000 रुपये गुंतवायचे म्हणजे दिवसाला फक्त 33 रुपये वाचवायचे. ही रक्कम 20 वर्षे गुंतवल्यास तुमची स्वतःची गुंतवणूक 2,40,000 रुपये होते. 12% चक्रवाढ व्याजाने 7,60,000 रुपये नफा मिळून 20 वर्षांनंतर तुमच्याकडे 10,00,000 रुपयांचा मोठा फंड तयार होतो.

हीच 1,000 रुपयांची SIP तुम्ही 30 वर्षे न थांबता चालू ठेवली, तर तुमची एकूण गुंतवणूक 3,60,000 रुपये होते. 30 वर्षांच्या चक्रवाढ व्याजाच्या ताकदीमुळे तुम्हाला फक्त व्याजातून 31,70,000 रुपये मिळतात. म्हणजेच 30 वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात तब्बल 35,30,000 रुपये येतात.

45
चक्रवाढ व्याज आणि वेळेचं महत्त्व

या गणितावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, गुंतवणुकीच्या रकमेपेक्षा तुम्ही किती काळ गुंतवणूक करता, हे जास्त महत्त्वाचं आहे. गुंतवणूक दुप्पट (500 वरून 1,000) केल्यास परतावा दुप्पट होतो. पण गुंतवणुकीचा काळ 20 वरून 30 वर्षे केल्यास, तुमचा परतावा साडेतीन पटीने वाढतो.

55
सर्वसामान्यांसाठी आर्थिक फायदे

मुलांचं उच्च शिक्षण, स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न किंवा म्हातारपणाची सोय यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबे या सोप्या गुंतवणुकीचा वापर करू शकतात. दरमहा 500 रुपयांपासून सुरुवात करून, उत्पन्न वाढेल तशी दरवर्षी गुंतवणूक 10% ने वाढवली (Step-up SIP), तर 30 वर्षांत तुम्ही 1 कोटी रुपयांचा मोठा फंड सहज उभा करू शकता.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories