ओटमीलने.. बरेच लोक सकाळी नाश्त्यामध्ये ओटमील खातात. या ओटमीलनेही फ्रीज स्वच्छ करता येते. फ्रीजमधून येणारी दुर्गंधी क्षणार्धात काढता येते. यासाठी थोडे ओट्स घेऊन एका अॅल्युमिनियमच्या भांड्यात घाऊन फ्रीजमध्ये ठेवा. थोड्या वेळाने फ्रीजमधून दुर्गंधी येणे कमी होते. व्हाईट व्हिनेगरनेही तुम्ही फ्रीजमधून येणारी दुर्गंधी कमी करू शकता. हे व्हिनेगर लोणचे, स्नॅक्समध्ये वापरतात. हे फ्रीजमधून येणारी दुर्गंधी काढण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी व्हिनेगर एका वाटीत किंवा ग्लासमध्ये घ्या. हे फ्रीज उघडून ठेवा. फ्रीजचा दरवाजा मात्र बंद करू नका. यामुळे दुर्गंधी पूर्णपणे निघून जाते.