Gold-Silver Rate Today : सोने दरात वाढ, तर चांदीचा भाव १० हजारांनी कमी झाला

Published : Jul 09, 2026, 05:31 PM IST
gold rate

सार

Gold - Silver Prices Today : सोने-चांदी दरात सतत चढ-उतार होत आहेत. आज सोन्याचा दर काहीसा वाढला आहे. तर चांदीचा भाव तब्बल १० हजार रुपयांनी कमी झाला आहे. 

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीपासून सोने-चांदीच्या दरात घसरण होत आहे. आजही आठवड्याच्या सलग चौथ्या दिवशी सोने - चांदी दरात घसरण झाली आहे. आज गुरुवारी ९ जुलै रोजी मौल्यवान धातूच्या दरात चढ-उतार झाले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने-चांदीचा भाव कमी झाला आहे. मात्र सराफा बाजारात सोने दरात काहीशी वाढ झाली आहे. तर चांदीचा भाव तब्बल १० हजारांनी कमी झाला आहे.

सराफा बाजारात सोने-चांदीचा भाव काय?

आज गुरुवारी सोने दरात काहीशी वाढ झाली, गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली. सोनं ११० रुपयांनी वधारलं आहे. या वाढीसह सोन्याचा भाव १,४३,४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा तर १०० रुपयांनी वाढला. या वाढलेल्या किमतीमुळे २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर १,३१,३०० रुपये इतका आहे. तर १८ कॅरेट सोन्याच्या किमतीतही ८० रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीसह १८ कॅरेट सोन्याची किमत १,०७,४३० रुपये इतकी आहे.

आजचा चांदीचा भाव किती?

सराफा बाजारात आज चांदीचा भाव उतरला आहे. चांदीचा भाव आज १० हजार रुपयांनी कमी झाला आहे. मागील चार दिवसांपासून चांदीच्या दरात जवळपास १५००० रुपयांची घसरण झाली आहे. आजचा चांदीचा भाव २,३५,००० रुपये इतका आहे.

सोने-चांदी दरात सतत चढ-उतार का?

अमेरिका आणि इराण यांच्या संघर्षाचा परिणाम सोने-चांदी या मौल्यवान धातूच्या किमतीवर होतो आहे. नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ८ जुलै रोजी बुधवारी इराणसोबतचा करार संपला असल्याचं जाहीर केलं. यामुळे तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. तसंच महागाई आणि बँकेचे व्याजदर वाढवण्याबाबत गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार, डॉलरच्या किमतीतील बदल, या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम मौल्यवान धातूच्या किमतीवर होतो. त्यामुळेच सोने-चांदी दर अस्थिर राहणयाची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mobile Safety : हॅकर्सची भीती वाटतेय? या सोप्या टिप्सने ठेवा तुमचा स्मार्टफोन सुरक्षित
कशावरही वापरा या 7 नोज रिंग्ज, 1 मिनिटात सुंदर लूक