
मुंबई : सध्याच्या काळात आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक फायद्याची ठरते. मात्र सध्या शेअर मार्केटच्या अनिश्चिततेच्या काळात तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत असाल, तर सरकारची एक योजना फायद्याची ठरू शकते. गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय शोधत असाल तर सरकारची अशी योजना आहे, ज्यात उत्तम रिटर्न्ससोबत सुरक्षित गुंतवणूक केली जाते.
सरकारी योजना
सरकारीची ही योजना आहे पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. सरकारकडून चालवली जाणारी ही योजना पोस्ट ऑफिस किंवा बँकेतही सुरू करता येते.
PPF योजना
या योजनेचा कालावधी १५ वर्षांचा असतो. अधिक कालावधीसाठी ही योजना असल्याने यात मुलांचं शिक्षण, रिटायर्डमेंटनंतरच्या योजना अशा गोष्टींचं प्लॅनिंग करणं सोपं जातं. ही सरकारी योजना असल्याने इतर पर्यायांच्या तुलनेत ही योजना सुरक्षितही असते.
चक्रवाढ व्याज आणि इन्कम टॅक्स फायदे
PPF योजनेत इन्कम टॅक्सचे फायदे मिळतात. तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेवर चांगलं व्याज मिळतं. महत्त्वाचं म्हणजे हे व्याज चक्रवाढ व्याज या पद्धतीने मिळतं. त्यामुळे अधिक फायदा होतो.
खातं सुरू करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रं
कोणताही भारतीय नागरिक हे PPF खातं उघडू शकतो. पालक त्यांच्या मुलांच्या नावानेही अकाऊंट ओपन करू शकतात.
पीपीएफ अकाऊंट ओपन करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, मोबाईल नंबर, सेव्हिंग बँक अकाऊंट अशा पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
१५ वर्षांचा लॉकअप टाइम
महत्त्वाची बाब म्हणजे या खात्यात वर्षाला कमीत कमी ५०० रुपये डिपॉझिट, तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये डिपॉझिट ठेवावे लागतात. हे पैसे १५ वर्ष लॉकअप टाइममध्ये ठेवणं गरजेचं असतं.
कसा होईल फायदा?
जर एखाद्या गुंतवणुकदाराने २००० रुपये महिन्याला जमा केले, तर वर्षाला त्याचे २४ हजार रुपये होतात. त्या हिशोबाने १५ वर्षात ३,६०,००० रुपये मुद्दल जमा होते. या १५ वर्षात या मुद्दलवर २.८ लाख रुपये व्याज मिळेल.
सध्या या पीपीएफ अकाऊंटवर ७.१ टक्के व्याज मिळतं आहे. त्यामुळे दरवर्षी व्याजाची रक्कम बदलली तर १५ वर्षांनी शेवटी मिळणाऱ्या