स्पॅम कॉल आणि मेसेजमुळे त्रस्त आहात? या पद्धतीने करा ब्लॉक

Published : Mar 19, 2025, 02:39 PM IST
spam calls 4.jpg

सार

How to Block Spam Calls : फोनवर सतत येणाऱ्या स्पॅम कॉल आणि मेसेजमुळे सध्या बहुतांशजण त्रस्त होतात. अशातच हे स्पॅम कॉल आणि मेसेज ब्लॉक करायचे असल्यास कोणत्या टिप्स वापराव्यात याबद्दल जाणून घेऊया.

How to Block Spam Calls : सध्याच्या काळात स्पॅम कॉल आणि मेसेज एक मोठी समस्या झाली आहे. यामुळे नागरिकांचा अधिक वेळ फुकट जातोच पण काहीवेळेस नुकसानही सहन करावे लागते. अशातच स्पॅम कॉल आणि मेसेजमुळे त्रस्त असाल तर ब्लॉक करण्यासाठी काही टिप्स फॉलो करू शकता.

DND सर्विस

स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून सुटका मिळवण्यासाठी सोपा पर्याय म्हणजे DND सर्विसचा वापर करू शकता. यासाठी आपल्या मोबाइल नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करुन DND सर्विस सुरू करण्यास सांगू शकता. डीएनडी सर्विस सुरू केल्यानंतर तुम्हाला प्रमोशनल कॉल आणि मेसेज येणे बंद होईल.

स्पॅम कॉल ब्लॉकिंग अ‍ॅप

गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोअरवर स्पॅम कॉल आणि मेसेज ब्लॉक करणारे काही अ‍ॅप उपलब्ध आहेत.

फोन क्रमांकावरुन करा ब्लॉक

स्मार्टफोनमध्ये क्रमांक ब्लॉक करण्याचे फीचर असते. एखाद्या अज्ञात क्रमांकावरुन सतत फोन किंवा मेसेज येत असल्यास ब्लॉक करू शकता.

शासकीय पोर्टलवर तक्रार दाखल करा

सातत्याने स्पॅम कॉल आणि मेसेज येत असल्यास TRAI च्या बेवसाइटवर जाऊन किंवा त्यांच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करुन स्पॅम कॉलची तक्रार करू शकता.

सतर्क रहा

कधीकधी अज्ञात क्रमांकावरुन फोन किंवा मेसेज येत असल्यास त्यावर उत्तर देऊ नका. याशिवाय आपली व्यक्तीगत माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करणे टाळा. याशिवाय कोणत्याही संशयित लिंकवर क्लिक करू नका.

PREV

Recommended Stories

PMMVY 2025: गुड न्यूज! आई झाल्यावर सरकार देणार ₹5000; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच करा अर्ज!
सामान कितीही असो! बूट स्पेसची समस्या कायमची मिटवा; 'या' आहेत सर्वाधिक स्टोरेज असलेल्या टॉप ५ स्कूटर्स!