Hotel Secrets: हॉटेलमधून साबणच नाही, तर 'या' गोष्टी तुम्ही फुकटात घरी आणू शकता!

Published : Apr 07, 2026, 11:02 PM IST

Hotel Secrets: आपण कामानिमित्त किंवा फिरायला गेल्यावर हॉटेलमध्ये थांबतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हॉटेलमधून चेक-आऊट करताना तुम्ही काही वस्तू कायदेशीररित्या घरी घेऊन जाऊ शकता? कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घ्या या लेखातून

PREV
13
1.हॉटेल टॉयलेट्री...
तुमच्या हॉटेलच्या रूममधील छोटा साबण, शॅम्पू, कंडिशनर आणि शॉवर कॅप तुम्ही घरी नेऊ शकता. मात्र, मोठ्या बाटल्यांमधील वस्तू नेऊ नयेत. यासोबतच, अनेक हॉटेल्स सुई-दोऱ्याचं छोटं शिवणकाम किट आणि टूथब्रश, टूथपेस्ट, रेझर असलेलं डेंटल व शेव्हिंग किटही देतात. या वैयक्तिक वापराच्या वस्तू तुम्ही सोबत नेऊ शकता.
23
चहा-कॉफीचे सॅशे आणि साखरेचे पाऊच
हॉटेलच्या रूममध्ये तुमच्यासाठी ठेवलेले चहा-कॉफीचे सॅशे आणि साखरेचे पाऊच तुम्ही वापरले नसल्यास घरी आणू शकता. तसेच, हॉटेलच्या नावाचे ब्रँडेड नोटपॅड आणि पेनही तुम्ही घेऊ शकता. मात्र, कोणतीही वस्तू जास्त प्रमाणात घेऊ नये हे लक्षात ठेवा.
33
5. फळांची किंवा स्नॅक्सची टोपली
अनेक हॉटेल्स वेलकम गिफ्ट म्हणून फळांची किंवा स्नॅक्सची टोपली देतात. ती पूर्णपणे तुमची असते, तुम्ही ती तिथेच खाऊ शकता किंवा घरीही आणू शकता. याशिवाय, हॉटेलमध्ये मिळणाऱ्या डिस्पोजेबल चपला आणि प्रसिद्धीसाठी ठेवलेली पोस्टकार्ड्स किंवा माहितीपत्रकंही तुम्ही आठवण म्हणून घरी नेऊ शकता.
Read more Photos on

Recommended Stories