Horoscope: 2026मध्ये या 5 राशींच्या जातकांना परदेशगमनाचा योग, जाणून घ्या माहिती

Published : Jan 03, 2026, 06:31 PM IST

Horoscope : या नव्या वर्षात अर्थात 2026 मध्ये ग्रहांची स्थिती काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणारी आहे. विशेषतः प्रवास, परदेशात जाण्याची संधी आणि नवीन आयुष्य सुरू करण्याचे योग जुळून येतील. परदेशगमनाचा योग असलेल्या राशी पाहूयात-. 

PREV
15
धनु रास

धनु राशीसाठी 2026 महत्त्वाचे आहे. गुरूच्या प्रभावामुळे परदेशात जाण्याच्या संधी वाढतील. एप्रिल-मे महिन्यामध्ये परदेशात स्थायिक होण्याचा विचार प्रबळ होईल. शिक्षण, नोकरीसाठी प्रवास फायदेशीर ठरेल.

25
मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्याचा वेग 2026 मध्ये वाढेल. युरेनसच्या प्रवेशामुळे अनपेक्षित बदल घडतील. मे-जूनमध्ये नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणामुळे परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

35
कुंभ रास

कुंभ राशीचे लोक चौकटीबाहेर विचार करतात. 2026 च्या जुलैपासून ग्रहांचे पाठबळ मिळेल. विचार प्रत्यक्षात येतील. परदेश प्रवास, नोकरीच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय संबंध वाढतील.

45
मकर रास

मकर राशीचे लोक नियोजनाने काम करतात. 2026 मध्ये गुरूच्या भ्रमणामुळे दूरच्या प्रवासाची संधी मिळेल. जून ते ऑक्टोबर हा काळ महत्त्वाचा आहे. करिअरमध्ये बदल आणि परदेशी नोकरीची संधी आहे.

55
मीन रास

मीन राशीचे लोक सखोल विचार करतात. 2026 च्या सुरुवातीपासून नवीन ओळखी वाढतील. फेब्रुवारी-मार्च आणि सप्टेंबरमध्ये प्रवासासाठी ग्रहस्थिती अनुकूल असेल. परदेशात स्थायिक होण्याची शक्यता आहे.

Read more Photos on

Recommended Stories