होंडा आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही 'होंडा अल्फा' भारतीय बाजारात २ डिसेंबर २०२६ रोजी अधिकृतपणे लाँच करणार आहे. या कारची ५०० किमी रेंज, बॅटरी क्षमता आणि इतर भन्नाट फीचर्सची माहिती आपण इथे पाहूया.
होंडा आता भारतीय ईव्ही मार्केटमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने २०२५ मध्ये '0 अल्फा' (0 Alpha) कॉन्सेप्ट मॉडेल सादर केले होते. याच मॉडेलचे प्रोडक्शन व्हर्जन कंपनी २ डिसेंबर २०२६ रोजी अधिकृतपणे लाँच करणार आहे.
बाजारात येताना याच्या नावातील '0' हटवला जाईल आणि ही कार फक्त 'होंडा अल्फा' (Honda Alpha) या नावाने विकली जाईल. गेल्या काही महिन्यांपासून होंडा भारतीय रस्त्यांवर या कारचे जोरदार टेस्टिंग करत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही कार अधिकृतपणे विक्रीसाठी आणण्याचा कंपनीचा प्लॅन आहे.
24
भारत बनणार ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब
होंडा कार्स इंडियाचे प्रेसिडेंट आणि सीईओ तोशियुकी यानागिसावा (Toshiyuki Yanagisawa) यांनी या कारबद्दल काही रंजक गोष्टी सांगितल्या. भारतीय ग्राहकांना मॉडर्न इलेक्ट्रिक मोबिलिटी देणे हे होंडा अल्फाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. होंडा ब्रँडला साजेसे क्वालिटी, विश्वास आणि ड्रायव्हिंगचा अनुभव ही कार देईल, असे ते म्हणाले.
भविष्यात या मॉडेलसाठी भारतच ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनणार आहे. होंडाच्या इलेक्ट्रिक प्रवासातील हा एक मोठा टप्पा असून, भारतीय बाजाराप्रती असलेली आमची भक्कम बांधिलकी यातून दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.
34
डिझाईन कसे असणार?
भारतीय रस्त्यांवरील टेस्टिंगचे स्पाय फोटोज पाहिले, तर हे प्रोडक्शन मॉडेल '0 अल्फा' कॉन्सेप्ट डिझाईनच्या अगदी जवळ जाणारे आहे. कॉन्सेप्ट मॉडेलप्रमाणेच यातही सरळ उभे फ्रंट आणि रिअर डिझाईन दिले आहे. मागच्या काचेजवळील टेल लॅम्प्स आणि जाड सी-पिलर (C-pillar) सारखे फीचर्स तसेच ठेवले आहेत. या कारचा बंपर सेटअपही हुबेहूब कॉन्सेप्ट मॉडेलच्या डिझाईनसारखाच दिसतो.
होंडा अल्फा एसयूव्हीचे अधिकृत टेक्निकल डिटेल्स कंपनीने अद्याप पूर्णपणे उघड केलेले नाहीत. पण, ही कार ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक (Hyundai Creta Electric) आणि मारुती सुझुकी ई-विटारा (Maruti Suzuki e-Vitara) या मॉडेल्सपेक्षा आकाराने मोठी असेल असा अंदाज आहे. यात ५० ते ७० kWh बॅटरीचे पर्याय मिळण्याची शक्यता आहे. रिअल वर्ल्ड कंडिशनमध्ये सिंगल फुल चार्जवर ४०० ते ५०० किमीची रेंज देईल, अशा पद्धतीने होंडा या एसयूव्हीचे डिझाईन करत आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .