Beauty Tips : महागड्या स्किनकेअर उत्पादनांच्या गर्दीतही दही आणि हळदीचा फेस पॅक वापरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आजीच्या बटव्यातील उपाय म्हणून प्रसिद्ध असलेले हे नैसर्गिक मिश्रण त्वचेसाठी खरंच फायदेशीर आहे का?, ते जाणून घेऊ.
हजारो रुपये खर्च करूनही आपला चेहरा निस्तेज दिसतो. आपण सुंदर दिसत नाही म्हणून दुःखी होतो. बाहेर जायलाही आवडत नाही. अशावेळी आपण आईने सांगितलेले स्किन केअर टिप्स आणि आजीने दिलेले ब्युटी सल्ले फॉलो करतो. म्हणूनच, महागडी स्किन केअर उत्पादने आणि पार्लर ट्रीटमेंट्सवर अवलंबून असलेल्या आजच्या काळातही, अनेकजण घरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पॅककडे वळत आहेत. विशेषतः, आजीच्या काळापासून चालत आलेला दही आणि हळदीचा फेस पॅक आजही लोकप्रिय आहे. त्वचेवर चांगला परिणाम होतो, असा विश्वास आहे. पण हा केवळ विश्वास आहे की वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे, यावर तज्ज्ञ काही रंजक गोष्टी सांगत आहेत.
25
हळद आणि दह्याच्या पॅकने त्वचा उजळेल
दही आणि हळदीपासून बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार दिसते, तसेच मुरुमे आणि काळे डाग कमी होतात, असा अनेकांचा विश्वास आहे. आजीच्या काळापासून चालत आलेला हा नैसर्गिक उपाय आजही वापरला जातो.
35
हे दोन्ही नैसर्गिक पदार्थ आहेत..घाबरू नका
ज्यांना पार्लर आणि स्किन केअर उत्पादने आवडत नाहीत, ते दही आणि हळदीचा पॅक वापरतात. हे दोन्ही नैसर्गिक पदार्थ असल्याने, कोणत्याही भीतीशिवाय ते थेट चेहऱ्यावर लावतात. तज्ज्ञांच्या मते, हळदीमधील कर्क्युमिन नावाचा घटक सोरायसिस, रेडिएशन डर्मेटायटिस आणि डाग यांसारख्या त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतो. इतकेच नाही, तर त्वचेवर कर्क्युमिन वापरणे सुरक्षित आहे आणि काही प्रकरणांमध्ये कॉर्टिकोस्टिरॉइड औषधांना पर्याय म्हणूनही याचा वापर होऊ शकतो, असेही ते सांगतात.
आता दह्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात लॅक्टिक ॲसिड असते. हे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि नवीन पेशी तयार होण्यास मदत करते. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. दह्यातील प्रोबायोटिक गुणधर्म त्वचेला ओलावा देतात, असे तज्ज्ञ सांगतात.
55
आठवड्यातून एकदा
हळदीमधील कर्क्युमिनमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे मुरुमे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तथापि, चेहऱ्यावर हळद लावताना ती अगदी कमी प्रमाणात वापरावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
दही आणि हळदीचे मिश्रण वापरल्याने चेहरा ताजातवाना दिसतो, तसेच टॅनिंगही काही प्रमाणात कमी होते. विशेषतः तेलकट त्वचा असलेल्यांनी आठवड्यातून एकदा हा फेस पॅक वापरल्यास त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.