Home Tips: आपल्या घरात तुटलेले किंवा जुने कंगवे हमखास असतात. आपण ते सरळ उचलतो आणि कचऱ्यात फेकून देतो. पण थांबा! हेच जुने कंगवे तुम्ही 5 वेगवेगळ्या कामांसाठी पुन्हा वापरू शकता. कसे ते जाणून घ्या या लेखात…..
प्रत्येक घरात कंगवा असतोच. काही महिने वापरला की त्याचे दात तुटतात किंवा तो जुना होतो. मग आपण तो फेकून देतो आणि नवीन आणतो. पण थांबा! जो कंगवा तुम्हाला निरुपयोगी वाटतो, तो अनेक कामांसाठी वापरता येतो. चला, ते उपयोग कोणते आहेत ते पाहूया.
24
1. अवघड जागांची सफाई
घरातील काही जागा स्वच्छ करणं खूप अवघड असतं. विशेषतः खिडक्या किंवा दारांच्या फटींमध्ये धूळ साचते. तिथे हात पोहोचत नाही. अशावेळी जुन्या कंगव्याला एक ओला कपडा गुंडाळा आणि त्या फटींमधून फिरवा. सगळी धूळ सहज निघून येईल.
34
2. बागकामासाठी...
घरातल्या लहान कुंड्यांमधील माती मोकळी करण्यासाठी मोठी अवजारं वापरता येत नाहीत. अशावेळी जुन्या कंगव्याने तुम्ही माती सहज भुसभुशीत करू शकता. यामुळे झाडांच्या मुळांना हवा मिळते. तसेच, बिया पेरल्यावर माती सारखी करण्यासाठीही कंगवा उपयोगी पडतो.
3. क्रिएटिव्ह पेंटिंग: तुम्ही किंवा तुमची मुलं पेंटिंग करत असाल, तर रंगात कंगवा बुडवून कागदावर फिरवून बघा. मस्त डिझाइन तयार होईल. 4. इअररिंग होल्डर: जुना कंगवा स्वच्छ करून भिंतीला लावा. त्याच्या दातांमध्ये तुम्ही कानातले अडकवून ठेवू शकता. 5. पाळीव प्राण्यांचे केस काढण्यासाठी: सोफा किंवा कार्पेटवर साचलेले तुमच्या पेट्सचे केस काढण्यासाठी कंगव्याने ती जागा विंचरा. सर्व केस कंगव्याला चिकटून येतील.