मुंबई - शारीरिक समस्या उद्भवण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काही सूचक संकेत देत असते. डॉ. विक्रम बी. कोल्हारी सांगतात, रात्री दिसणारी काही लक्षणं हृदय, किडनी किंवा लिव्हरच्या समस्यांची सूचक असू शकतात. वेळीच ओळखल्यास धोका टाळता येऊ शकतो.
रात्री वारंवार लघवीला जायला लागतंय? झोपेत श्वास घ्यायला त्रास होतोय? उठल्या उठल्या घाम येतोय? झोप नीट न झाल्याने असं होत असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. कारण हे तुमच्या हृदय, लिव्हर आणि किडनीच्या समस्येचं लक्षण असू शकतं.
27
हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं असू शकतात
रात्री दिसणारी ही लक्षणं लोकं सहसा दुर्लक्ष करतात, असं डॉक्टर सांगतात. पण ही हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज, किडनीचा आजार (CKD) आणि लिव्हरच्या समस्येमुळेही ही लक्षणं दिसू शकतात.
37
याला 'नॉक्टुरिया' म्हणतात
रात्री वारंवार लघवीला जायला लागण्याला 'नॉक्टुरिया' म्हणतात. ही सामान्य समस्या नाही, तर हृदयविकार किंवा किडनीच्या आजाराचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नका. आपण जास्त पाणी पितो म्हणून जास्त लघवीला जातो असाही समज करुन घेऊ नका. डॉक्टरांकडे तपासून घ्या.
अपोलो हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विक्रम बी. कोल्हारी यांच्या मते, रात्री झोपताना द्रव रक्तात मिसळून किडनीद्वारे गाळला जातो. त्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं. जर रुग्णाला किडनीचा त्रास असेल तर किडनी गाळण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे दिवस आणि रात्री दोन्ही वेळा जास्त लघवी होते. विशेषतः रात्रीच्या वेळी समस्या वाढते.
57
हे संकेत तुम्ही जराही टाळू नका
रात्री जास्त लघवी होत असेल आणि पायांना सूज असेल, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे. हे संकेत तुम्ही जराही टाळू नका. याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात तुम्हाला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते.
67
हृदय रक्त योग्यरित्या पंप करू शकत नाही
रात्री श्वास घेण्यास त्रास होणे म्हणजे फुफ्फुसात द्रव साचल्याने तुमचं हृदय रक्त योग्यरित्या पंप करू शकत नाही, असे दिसून येते. यासाठी त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमची तपासणी करुन घ्या. हे संकेत अतिशय महत्त्वाचे असतात. योग्य औषधोपचार घेतल्यावर आजार बरा होऊ शकतो.
77
हे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजचं लक्षण आहे
रात्रीच्या वेळी जास्त घाम येत असेल तर तुमचं हृदयाला जास्त काम करावं लागतंय. हे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजचं लक्षण आहे. यावेळी तुम्हाला छातीत दुखणे, जास्त ताण आणि बद्धकोष्ठता जाणवत असेल, तर तुम्हाला हृदयाची समस्या किंवा उच्च रक्तदाब असू शकतो.