Health Tips: पावसाळा आला की डासांचा त्रास वाढतो. यामुळे डेंग्यूसारखे गंभीर आजार पसरण्याचा धोका असतो. पण काळजी करू नका, डासांपासून होणारे आजार टाळण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचा वापर करू शकता. जाणून घेऊया कसा.
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कडुलिंबाची ताजी पानं आणि चहापत्ती टाका. हे मिश्रण चांगलं उकळू द्या. दिवसातून तीन वेळा हा चहा प्यायल्यास आरोग्याला फायदा होतो.
26
कडुलिंबाचा ज्यूस
कडुलिंबाच्या पानांमध्ये थोडं पाणी घालून ती चांगली वाटून घ्या. या रसात थोडं मध आणि लिंबाचा रस मिसळून तुम्ही तो पिऊ शकता.
36
कडुलिंबाचे पाणी
कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून ते चांगलं उकळवा. पाणी थंड झाल्यावर ते गाळून प्या. डासांमुळे होणारे आजार टाळण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे.
कडुलिंबाच्या तेलात थोडं खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण त्वचेवर लावल्यास डास चावण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
56
वाटलेली कडुलिंबाची पाने
कडुलिंबाची पानं चांगली वाटून त्याची पेस्ट तयार करा. डास चावलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावा. यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होते.
66
कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ
आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पानं टाकून ते चांगलं उकळवा. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्याने आंघोळ करा. यामुळे त्वचेचं संरक्षण होतं आणि आजार दूर राहतात.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .