Health Tips : तुमचे केस निर्जीव होऊन गळत आहेत का? शॅम्पू आणि इतर ट्रीटमेंट्सने तात्पुरता उपाय ठरतो. पण यावर खरा उपाय तर आपल्या घरातच आहे. खोबरेल तेलाच्या काही सोप्या टिप्स तुमच्या केसांना पुन्हा जिवंत करतील. चला तर मग पाहूया त्या काय आहेत...
बाजारात मिळणारे वेगवेगळे शॅम्पू वापरल्यामुळे केस निर्जीव होतात, गळतात, दुभंगतात आणि कोंडा होतो. मग त्यावर उपाय म्हणून त्या पुन्हा काहीतरी प्रयत्न करतात, दवाखान्यात जातात. पण या सगळ्याआधी केसांना खोबरेल तेल लावणं गरजेचं आहे, हे लक्षात घेतले जात नाही.
बाजारात अनेक प्रकारचे Hair Oil उपलब्ध असले तरी, पिढ्यानपिढ्या वापरले जाणारे खोबरेल तेल एक वरदान आहे. खोबरेल तेल केसांच्या मुळांना मजबूत करते. यामुळे केसांची वाढ चांगली होते. तुमचे केस कोरडे असल्यास, खोबरेल तेल आवश्यक ओलावा देऊन त्यांना मऊ ठेवते. हे केसांचे नुकसान आणि दुभंगलेल्या टोकांना प्रतिबंधित करते. पण खोबरेल तेलात काही पदार्थ मिसळून लावल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात.
25
खोबरेल तेल आणि अंडं
तुमचे केस वेगाने वाढावेत यासाठी, अंड्यामध्ये खोबरेल तेल मिसळल्यास उत्तम परिणाम मिळतात. अंड्यांमध्ये प्रथिने आणि बायोटिन भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि आवश्यक पोषण देतात. एका भांड्यात अंडं फोडून चांगलं मिसळा. त्यात २ चमचे शुद्ध खोबरेल तेल घालून एकत्र करा. हे मिश्रण टाळूपासून केसांच्या टोकांपर्यंत लावा. २० ते २५ मिनिटे तसेच ठेवा आणि कोमट पाण्याने व कमी Ph असलेल्या शॅम्पूने धुवा. यामुळे तुमच्या केसांना ताकद आणि चमक मिळेल.
35
मेथी आणि खोबरेल तेल
केसांची वाढ वेगाने होण्यासाठी मेथीचे दाणे मदत करतात. मेथीत प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे केसगळती कमी करून केसांच्या वाढीस मदत करते. मेथीचे दाणे काही दिवस खोबरेल तेलात भिजवून ठेवा. नंतर तेल गाळून बाजूला ठेवा. हे तेल तुमच्या केसांना लावून मसाज करा. नियमितपणे असे केल्यास कमी वेळात दाट आणि लांब केस मिळवू शकता. हे डोक्यातील कोंडा देखील दूर करते.
अनेकजण केसांना मध लावल्यास केस पांढरे होतात असे मानतात. पण ही ट्रिक वापरल्यास केस पांढरे होणार नाहीत, उलट तुमचे केस अधिक चमकदार होतील. मध तुमच्या केसांना ओलावा देतो. दोन चमचे खोबरेल तेलात एक चमचा मध मिसळा. हा मास्क तुमच्या केसांना लावून २०-२५ मिनिटे ठेवा. त्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. खोबरेल तेल केसांना मऊ बनवते. सौम्य शॅम्पू वापरून केस धुवा. तुमचे केस रेशमी होतील.
55
खोबरेल तेल आणि दही
दह्यातील प्रोबायोटिक्स आणि लॅक्टिक ॲसिड टाळू स्वच्छ करतात. मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात आणि केसांच्या वाढीस सहाय्यभूत ठरतात. दोन चमचे दह्यात दोन चमचे खोबरेल तेल घालून ते मिश्रण टाळूला लावून मसाज करा. ३० मिनिटे तसेच राहू द्या. हे उष्णता कमी करून टाळूला थंडावा देते. खोबरेल तेल केसांना खोलवर आर्द्रता देते. अर्ध्या तासानंतर केस धुतल्यास टाळू निरोगी राहते आणि केस चमकदार होतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या पद्धती वापरल्यास निरोगी आणि सुंदर केस मिळवू शकता.