- गरोदरपणात चालताना हळू आणि आरामात चाला.
- चालताना थकवा जाणवल्यास लगेच चालणे थांबवा.
- जास्त वेळ चालणार असाल तर, सोबत पाण्याची बाटली ठेवा.
- बाहेर चालताना एकटे चालू नका. गटागटाने चाला. यामुळे मानसिक ताण कमी होतो.
- चालताना व्यायामासाठी योग्य पादत्राणे आणि कपडे घाला.
- डोंगराळ किंवा निसरड्या ठिकाणी चालू नका.
- गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे त्या काळात पायऱ्या चढू-उतरू नका.
- चालताना छातीत दुखणे, पायांवर सूज, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास झाल्यास, त्वरित चालणे थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- गरोदरपणात चालणे आरोग्यदायी असले तरी, चालण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.