110
किडनी खराब होण्याची काही लक्षणं
किडनी खराब होण्याची काही प्रमुख लक्षणं कोणती आहेत, ते या फोटोगॅलरीमधून जाणून घेऊया.
Subscribe to get breaking news alertsSubscribe 210
कंबरदुखीचा त्रास
जेव्हा किडनीचं काम मंदावतं, तेव्हा कंबरदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो. हे किडनीच्या समस्येचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं.
310
चेहऱ्यावर अचानक सूज
चेहऱ्यावर अचानक सूज येणं, हे सुद्धा किडनी खराब होण्याचं एक लक्षण असू शकतं. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष द्या.
410
लघवीला जास्त फेस येणं
लघवीला जास्त फेस येणं हे किडनीच्या समस्येचं लक्षण असू शकतं. तसंच, लघवीचा रंग गडद होणं किंवा लघवीचं प्रमाण कमी-जास्त होणं याकडेही दुर्लक्ष करू नका.
510
लघवीसाठी वारंवार उठावं लागणं
रात्रीच्या वेळी लघवीसाठी वारंवार उठावं लागत असेल, तर हे किडनीच्या समस्येचं एक सूचक लक्षण असू शकतं.
610
त्वचेला खाज सुटणे
किडनी निकामी होऊ लागल्यावर रक्तातील विषारी घटक आणि क्षार जमा होतात. यामुळे त्वचेला खाज सुटते आणि त्वचा कोरडी पडू लागते.
710
अंगावर सूज
किडनीचं काम मंदावल्यामुळे शरीरात पाणी साठू लागतं. यामुळे पायांवर, हातांवर, डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावर सूज येऊ शकते.
810
पाठ आणि पोट दुखणं
पाठीच्या आणि पोटाच्या बाजूला दुखणं, मळमळ आणि उलट्या होणं ही देखील किडनीच्या आजाराची लक्षणं असू शकतात.
910
शरीरात खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
थकवा आणि अशक्तपणा अनेक कारणांमुळे येऊ शकतो. पण किडनीच्या समस्येमुळेही शरीरात खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
1010
डॉक्टरांचा सल्ला घ्या
वर दिलेली लक्षणं दिसल्यास स्वतःच कोणताही निष्कर्ष काढू नका. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणीनंतरच योग्य निदान करा.