Health Alert: बफेमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये जर आपल्याला फुकट जेवण मिळत असेल तर पोट भरल्याची जाणीव होत नाही. एकापाठोपाठ एक पदार्थ खाल्ले जातात. फुकट आहे म्हटल्यानंतर असं का होतं? याचा कधी विचार केला आहे का? चला तर जाणून घेऊया या मागचे कारण…
'फुकट' हा शब्द ऐकताच माणसाचे कान टवकारतात. नुकतंच जेवण झालं असलं तरी, जेवण मोफत आहे म्हटल्यावर भूक लागायला सुरुवात होते. बफे असो किंवा ताटासमोर बसलेलो असो, आवडो वा न आवडो, चव बघण्याच्या बहाण्याने आपण ताट भरून घेतो. भूक नाही म्हणणारे पोट भरेपर्यंत जेवतात. फुकट मिळाल्यावर जास्त खाणं ही फक्त सवय नाही, तर त्याचा संबंध मेंदूशी आहे.
27
मानसिक स्थिती
इथे जेवणाची चव आणि ते 'फुकट' असल्याची मानसिक स्थिती दोन्ही एकत्र होतात. तेव्हा आपलं नियंत्रणाचं भान सुटतं. खरं तर, भुकेमुळे आपण इतकं जेवत नाही. आपलं आरोग्य बिघडलं किंवा पचन नीट झालं नाही तरी, फुकट जेवणाची सुवर्णसंधी सोडायला मन तयार होत नाही.
37
सामाजिक कारण
याशिवाय, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकही अनेकदा जास्त खाण्यास कारणीभूत ठरतात. ग्रुपमध्ये जेवताना, लोक एकटं जेवण्यापेक्षा जास्त खातात. कारण सामाजिक वातावरणात जेवण्याचा आनंद जास्त खाण्यास प्रोत्साहन देतो.
मेंदू चव, आकार आणि विविधतेवर प्रतिक्रिया देतो. गोड, खारट किंवा ताज्या जेवणासारखे चविष्ट, जास्त कॅलरी असलेले पदार्थ मेंदूला उत्तेजित करतात. यामुळे खाण्याची इच्छा वाढते.
57
प्लेटचा आकार
अनेक वेळा आपण जास्त खाण्यामागे प्लेटचा आकारही कारणीभूत असतो. मोठी प्लेट आणि विविध प्रकारचे पदार्थ पाहिल्यावर मन सगळं खाण्यासाठी उत्सुक होतं. मेंदू त्याला योग्य प्रमाण समजतो.
67
हार्मोन्स
जेवण फुकट असताना लोक 'मला हे पुरेसं आहे' असा विचार करत नाहीत. यामुळे स्रवणारे हार्मोन्स आणि स्वभाव भुकेपेक्षा जास्त खाण्यास कारणीभूत ठरतात. याच कारणामुळे आपण बफे किंवा फुकट पदार्थ पाहिल्यावर, भूक नसतानाही, जे लोक घरी रोज इतकं खात नाहीत, तेही ताट भरून घेतात.
77
आरोग्यासाठी धोकादायक
फुकट आहे म्हणून जास्त खाल्ल्याने आरोग्य बिघडते. यामुळे वजन, साखर आणि कोलेस्ट्रॉल वाढते. चयापचय क्रियेवर वाईट परिणाम होतो. फुकट जेवताना मिळेल ते खाऊ नका. भूक आणि पौष्टिकतेचा विचार करून योग्य प्रमाणात खा. योग्य वेळी गरजेपुरते खाल्ल्यास ते आरोग्यासाठी चांगले राहील.