Health Alert: उन्हाळा वाढला की हृदय रुग्णांनी जास्त काळजी घ्यायला हवी. योग्य आहार आणि भरपूर पाणी पिऊन तुम्ही हृदयाची काळजी घेऊ शकता. उन्हाच्या त्रासापासून स्वतःला वाचवण्यासाठी काही सोप्या टिप्स इथे देत आहोत.
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी त्वचा जास्त रक्ताचा पुरवठा करते. त्यामुळे हृदयाला नेहमीपेक्षा 2 ते 4 पट जास्त वेगाने काम करावं लागतं. कमजोर हृदयासाठी हा अतिरिक्त भार असतो.
29
घाम आणि रक्ताची घनता!
जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं. यामुळे रक्त 'घट्ट' होण्याची शक्यता असते. हे घट्ट रक्त शरीरात पंप करण्यासाठी हृदयाला खूप मेहनत करावी लागते. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.
39
इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन!
घामासोबत सोडियम, पोटॅशियमसारखी आवश्यक खनिजंही बाहेर पडतात. हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यासाठी पोटॅशियम खूप महत्त्वाचं आहे. याची पातळी कमी झाल्यास हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.
रक्तदाब किंवा हृदयासाठी तुम्ही घेत असलेली 'डाययुरेटिक्स' (Diuretics) सारखी औषधं शरीरातील पाणी बाहेर टाकतात. उन्हाळ्यात या औषधांमुळे तुम्हाला लवकर थकवा येऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोस बदलू नका!
59
'हीट स्ट्रोक' - धोक्याची लक्षणं!
जास्त तहान लागणं, चक्कर येणं, गोंधळल्यासारखं वाटणं आणि धाप लागणं या लक्षणांकडे हृदय रुग्णांनी लक्ष द्यावं. उन्हाळ्यात घाम यायला हवा, पण घाम न येता त्वचा कोरडी पडली असेल, तर तो धोक्याचा इशारा आहे.
69
थंड पाणी - धोकादायक?
उन्हातून आल्यावर बर्फाचं थंड पाणी पिणं बरं वाटतं. पण अचानक थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाला धक्का बसू शकतो. सामान्य तापमानाचं पाणी पिणंच उत्तम!
79
व्यायामाची वेळ :
जे लोक व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक करतात, त्यांनी सकाळी ७ च्या आत किंवा संध्याकाळी 6 नंतरच घराबाहेर पडावं. दुपारच्या उन्हात व्यायाम करणं हृदयासाठी धोकादायक आहे.
89
पाणीदार फळं आणि भाज्याच आहेत औषध!
जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा. टरबूज, काकडी, खरबूज यांसारखे पाणीदार पदार्थ आहारात समाविष्ट करा. हे हृदयाचा भार कमी करणारे 'नॅचरल कूलंट' आहेत.
99
तुमचं हृदय तुमच्या हातात!
उन्हाळा फक्त सेलिब्रेशनसाठी नाही, तर स्वतःची काळजी घेण्यासाठीही असतो. तहान लागेपर्यंत थांबू नका, वेळोवेळी पाणी पित राहा. तुमच्या हृदयाचे ठोके सुरक्षित राहू द्या!
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .