Passion Plus GST New Regime : केंद्र सरकारने GST मध्ये बदल केले आहेत, हे तुम्हाला माहीतच असेल. यामुळे काही वस्तूंवरील टॅक्स मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आता GST 2.0 मुळे पॅशन प्लस बाईकची किंमत किती कमी झाली आहे, ते पाहूया.
GST कमी झाल्याने हीरो पॅशन प्लसची किंमत घटली आहे. दिल्लीत एक्स-शोरूम किंमत ₹83,190 वरून ₹76,691 झाली आहे. कमी बजेटमधील या बाईकला मोठी मागणी असून, आता किंमत कमी झाल्याने मागणी आणखी वाढेल.
27
इंजिन आणि मायलेजची माहिती
यात 97.2cc एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क देते. 4-स्पीड गिअरबॉक्ससह, बाईक 85 kmph चा टॉप स्पीड गाठते. 70 kmpl मायलेजमुळे फुल टँकवर (11 लीटर) 750 किमी प्रवास शक्य आहे.
37
आकर्षक फीचर्स
रोजच्या प्रवासासाठी या बाईकमध्ये अनेक आकर्षक फीचर्स दिले आहेत. यात i3S टेक्नॉलॉजी, सेमी-डिजिटल मीटर, ट्रिप मीटर, फ्युएल गेज, USB चार्जिंग पोर्ट आणि साइड-स्टँड इंजिन कटऑफ यांचा समावेश आहे.
हीरो पॅशन प्लसमध्ये पुढे आणि मागे 130 mm ड्रम ब्रेक आहेत. हे इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम (IBS) सह येतात. ही सिस्टीम बाईक थांबवताना अधिक सुरक्षितता प्रदान करते.
57
या कंपन्यांना देणार टक्कर
ही बाईक प्रामुख्याने होंडा शाइन 100, TVS रेडिऑन आणि बजाज प्लॅटिना यांसारख्या 100cc कम्युटर बाईक्सना टक्कर देते. चांगले मायलेज, आरामदायी प्रवास आणि कमी किंमतीमुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
होंडा अॅक्टिव्हाही झाली स्वस्त
67
18 हजारांपेक्षा जास्त सूट
केंद्र सरकारने देशभरात जीएसटी कमी करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी होत आहेत. विशेषतः, वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अनेक वाहनांच्या किमती खूप कमी होत आहेत. यामध्ये होंडा स्कूटर आणि बाईकच्या किमतीही कमी होत आहेत. होंडा स्कूटर आणि बाईकवर 18 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे.
77
होंडा ॲक्टिव्हाची किंमत
होंडा ॲक्टिव्हाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. विशेषतः होंडा ॲक्टिव्हा 110 स्कूटरची किंमत 7,874 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे होंडा ॲक्टिव्हा आता स्वस्त दरात उपलब्ध आहे. होंडा ॲक्टिव्हाच्या नावावर भारतात सर्वाधिक विक्रीचा विक्रम आहे. आता या किमतीतील कपातीमुळे ग्राहकांना खरेदीसाठी आणखी प्रोत्साहन मिळेल.