Ladki Bahin Yojana Bihar : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तेथील एनडीए सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजने'अंतर्गत महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजने'चा शुभारंभ केला. या कार्यक्रमात 75 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये थेट जमा करण्यात आले.
25
महिला सक्षमीकरण योजनेचा उद्देश
महिलांसाठी स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधी वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आर्थिक मदत देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा सरकारचा उद्देश आहे.
35
2 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार
पहिल्या टप्प्यात प्रत्येक लाभार्थी महिलेला 10,000 रुपये थेट जमा केले जात आहेत. भविष्यात गरज पडल्यास 2 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाईल. या निधीचा वापर महिला विविध व्यवसायांसाठी करू शकतील.
ही योजना केवळ आर्थिक मदतच देत नाही, तर बचत गटांमार्फत प्रशिक्षणही देते. महिलांनी सुरू केलेल्या व्यवसायांना पाठिंबा देणे आणि ग्रामीण आठवडी बाजारांचा विकास करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
55
मला खूप आनंद झाला आहे: पंतप्रधान मोदी
या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी मोदींनी जनतेला संबोधित केले. नवरात्रीच्या काळात बिहारच्या महिलांच्या आनंदात सहभागी होता आल्याचा आनंद आहे, असे ते म्हणाले. त्यांचे आशीर्वाद हीच मोठी ताकद आहे.