Google News down: जगभरातील Google सेवा प्रभावित; बातम्या आणि ट्रेंडवर प्रभाव

गूगल न्यूज बंद लाखो वापरकर्ते Google च्या काही सेवा वापरण्यास सक्षम नाहीत. तथापि, Google चे शोध घेत कि असे कोणत्या कारणामुळे झाले आहे.

Ankita Kothare | Published : May 31, 2024 3:00 PM IST

शुक्रवारी संध्याकाळी गुगलच्या काही सेवांवर परिणाम झाला असल्याचे समोर आले आहे. अनेक वापरकर्त्यांनी गुगल न्यूज काम करत नसल्याची तक्रार केली आहे . यामध्ये News टॅब आणि Google News चे मुख्यपृष्ठचा समावेश आहे. त्याच वेळी, Google डिस्कवरचे होम पेज फीड आणि Google Trends देखील काम करत नसल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर युजर्सनी याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

गुगल न्यूज टॅबबद्दल बोलायचे तर, वापरकर्त्यांना त्यात सर्वाधिक समस्यांचा सामना करावा लागला आहे. अनेक वेळा सर्च केल्यानंतर 'कोणत्याही बातमीच्या निकालाशी जुळत नाही' असा संदेश वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर नोंदवला. सर्च इंजिनच्या पर्सनलाइज्ड कंटेंट फीड 'गुगल डिस्कव्हर' बद्दल बोलताना, वापरकर्त्यांना 'समथिंग वेन्ट रॉंग' आणि 'कोणती स्टोरी उपलब्ध नाही, नंतर पुन्हा प्रयत्न करा' असे मेसेज आल्याचे पोस्ट मध्ये दिसत आहेत.

जीमेल आणि गुगल मॅप्सवरही परिणाम :

Downdetector नुसार, काही देशांमध्ये जीमेल, गुगल सर्च आणि गुगल मॅपच्या सेवांवरही परिणाम झाला आहे. अनेक अहवालांचा अभ्यास केल्यानंतर डाउनडिटेक्टरने डेटा जारी केला आहे. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 65 टक्के लोकांनी गुगलशी संबंधित वेबसाइट्स ऍक्सेस करण्यासंबंधीची माहिती शेअर केली आहे. 31 टक्के युजर्सनी गुगल सर्च वापरण्याबाबतची माहिती शेअर केली आहे आणि चार टक्के यूजर्सनी लॉग इन करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती शेअर केली आहे.

आणखी वाचा :

NEET UG 2024 : नीट यूजी परीक्षेच्या निकाल तारखेसह प्रोव्हिजनल उत्तर पत्रिका जाहिर, जाणून घ्या अन्य महत्त्वाची माहिती

घरात किती रक्कम ठेवू शकता? अन्यथा पडाल समस्येत, वाचा Income Tax चा नियम

Share this article