
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनमध्ये फोटो, व्हिडीओ, कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या फाइल्स मोठ्या सेव्ह केले जातात. या डेटाचा बॅकअप घेण्यासाठी Google Photos आणि Google Driveसारख्या क्लाउडचा वापर केला जातो. याशिाय गुगल अकाउंटसोबत मिळणारा 15GB मोफत स्टोरेज भरला जातो. विशेष म्हणजे अनेकदा डुप्लिकेट फोटो-व्हिडीओ आणि अनावश्यक बॅकअपमुळे स्टोरेजची जागा कमी होते. पण काही सेटिंग्समध्ये बदल करुन स्पेस तयार करू शकता.
गुगल अकाउंटसोबत साधारणपणे 15GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र ही स्पेस फक्त गुगल ड्राइव्हसाठी नसते. Gmail, Google Photos आणि इतर गुगल सेवांसाठी याचा वापर करता येतो. याशिवाय अॅन्ड्रॉइ़ड फोनचा बॅकअपही या स्टोरेजचा वापर करू शकतो. तुम्ही नियमितपणे फोटो आणि व्हिडीओंचा बॅकअप घेत असाल, तर काही काळातच 15GB स्टोरेज भरू शकतो.
गुगल स्टोरेज लवकर भरण्यामागे डुप्लिकेट बॅकअप हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. जसे की, व्हॉट्सअॅपचा डेटा गुगल ड्राइव्हवर बॅकअप होत असतो. त्याच वेळी गुगल फोटोज तुमच्या फोनमधील व्हॉट्सअॅप फोल्डरमधील फोटो आणि व्हिडीओंचा वेगळा बॅकअप घेतो.अशा परिस्थितीत एकच फोटो किंवा व्हिडीओ वेगवेगळ्या ठिकाणी सेव्ह होऊ शकतात. यामुळे गुगल अकाउंटमधील स्टोरेज भरले जाते.
स्टोरेज वाचवण्यासाठी सर्वप्रथम गुगल फोटोजमध्ये कोणत्या फोल्डर्सचा बॅकअप सुरू आहे, हे तपासा. व्हॉट्सअॅप किंवा इतर मेसेजिंग अॅपमधील मीडियाचा आधीच बॅकअप होत असेल, तर त्या फोल्डरचा गुगल फोटोजचा बॅकअप बंद करता येतो.मात्र, बॅकअप बंद केल्याने यापूर्वी गुगल फोटोजमध्ये अपलोड झालेल्या फाइल्स आपोआप डिलीट होत नाहीत. त्यामुळे जुन्या आणि अनावश्यक फोटो-व्हिडीओ वेगळे शोधून हटवावे लागतील.
व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि चॅट्समध्ये दररोज मोठ्या प्रमाणात फोटो, GIF, मीम्स आणि व्हिडीओ येतात. यातील अनेक फाइल्सची गरज नसते. त्यामुळे महत्त्वाचे फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करुन अनावश्यक मीडिया तुम्ही डिलिट करू शकता. यामुळे स्टोरेजही वाढला जातो.
फोटो आणि व्हिडीओशिवाय अॅन्ड्रॉइड फोनमधील काही अॅप्सचा डेटा देखील गुगल स्टोरेजमध्ये बॅकअप होऊ शकतो. त्यामुळे फोनच्या Settings > Google > Backup या पर्यायामध्ये जाऊन कोणत्या डेटाचा बॅकअप घेतला जात आहे का हे तपासून पाहा.
गुगल स्टोरेज भरत असेल तर लगेच अतिरिक्त स्टोरेज प्लॅन घेण्यापूर्वी काही गोष्टी तपासा. अनावश्यक फोटो-व्हिडीओ डिलीट करा. गुगल फोटोजमधील नको असलेले फोल्डर बॅकअप बंद करा, डुप्लिकेट फाइल्स हटवा आणि अॅप बॅकअप तपासून पाहा.