New UPI Rule : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) नवीन नियमानुसार, जे UPI आयडी बऱ्याच काळापासून न वापरलेल्या किंवा बंद झालेल्या मोबाईल नंबरशी लिंक आहेत, ते बंद केले जाऊ शकतात.
आजकाल चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत, सर्वत्र पेमेंटसाठी Google Pay, PhonePe किंवा Paytm सारखे UPI ॲप्स वापरले जातात. पण, तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं UPI अकाउंट तात्पुरतं बंद होऊ शकतं. त्यामुळे, लागू करण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या नवीन नियमाबद्दल वापरकर्त्यांनी नक्कीच जाणून घेतलं पाहिजे.
24
UPI अकाउंट का ब्लॉक केलं जातं? -
अनेक वेळा आपला UPI आयडी निष्क्रिय केला जातो, पण आपल्याला ते कळत नाही. पेमेंट अयशस्वी झाल्यावरच अनेकांना कळतं की त्यांचं अकाउंट ब्लॉक झालं आहे. यामागे चुकीची किंवा कालबाह्य झालेली माहिती वापरणं हे मुख्य कारण आहे.
34
नवीन नियम काय सांगतो? -
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आणलेल्या नवीन नियमानुसार, प्रत्येक UPI अकाउंट एका सक्रिय (Active) आणि योग्य मोबाईल नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे.
जर एखादा वापरकर्ता आपला मोबाईल नंबर बऱ्याच काळापासून वापरत नसेल किंवा तो नंबर बंद (Disconnected) झाला असेल, तर त्या नंबरशी लिंक असलेला UPI आयडी 'धोकादायक' मानला जाईल.
ज्या अकाउंट्सची ओळख पडताळणी (KYC) पूर्ण झालेली नाही किंवा ज्यांवरून बऱ्याच काळापासून कोणताही व्यवहार झालेला नाही, त्यांच्यावर निर्बंध लादले जातील.