PVC आधार कार्ड: घरबसल्या अर्ज करा, सोपी प्रक्रिया जाणून घ्या

Published : May 05, 2025, 04:20 PM IST
PVC आधार कार्ड: घरबसल्या अर्ज करा, सोपी प्रक्रिया जाणून घ्या

सार

PVC आधार कार्ड : घरबसल्या पीव्हीसी आधार कार्डसाठी कसा करावा अर्ज? स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घ्या…

PVC आधार कार्ड : ‘आधार कार्ड’ (pvc aadhar card) हे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. ते घरी विसरलात किंवा हरवले तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांपासून सुटका मिळावी म्हणून ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) ने PVC आधार कार्ड ऑनलाइन ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता एटीएम किंवा पॅन कार्डप्रमाणेच आधार कार्डही मिळणार आहे.

UIDAI च्या संकेतस्थळावरून पीव्हीसी आधार कार्डसाठी कसा अर्ज करायचा? किती शुल्क भरावे लागते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…

अर्ज कसा कराल?

  • UIDAIच्या अधिकृत वेबसाइट UIDAI ची अधिकृत वेबसाइट येथे भेट द्या
  • ऑनलाईन अर्ज हा पर्याय दिसेल
  • आधार कार्डवरील १२ अंकी क्रमांक सबमिट करा
  • सिक्युरिट कोड किंवा कॅप्चा कोड सबमिट करा
  • ओटीपी क्रमांकाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
  • मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक सबमिट करा
  • ‘माझे आधार’ (My Aadhaar) वर क्लिक करून ‘आधार PVC कार्ड ऑर्डर करा’ (Order Aadhaar PVC Card) हा पर्याय निवडा
  • दिलेल्या माहितीची पडताळणी करून ‘पुढे’ (Next) पर्यायावर क्लिक करा
  • पेमेंटसाठी विविध पर्याय उपलब्ध असतील, तुमच्या सोयीनुसार एक पर्याय निवडा
  • ५० रुपये शुल्क भरावे लागेल
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पाच दिवसांत आधार कार्ड पोस्ट ऑफिसमध्ये पाठवले जाईल
  • पोस्ट ऑफिसद्वारे स्पीड पोस्टने PVC आधार कार्ड तुमच्या घरी पोहोचवले जाईल.

काय काळजी घ्यावी?

  • पीव्हीसी आधार कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक बरोबर आहेत याची खात्री करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पेमेंटची पद्धत निश्चित करा.
  • पीव्हीसी कार्ड ट्रॅक करण्यासाठी आधार कार्ड आणि व्हर्च्युअल आयडी जवळ ठेवा.

PREV

Recommended Stories

लेकीचं भविष्य सुरक्षित! सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹५००० गुंतवल्यास २१ वर्षांनी मिळतील एवढे लाख? आकडेवारी पाहा!
Apple चा सर्वात मोठा धमाका! 2026 मध्ये येतोय 'आयफोन फोल्ड' सह ६ शक्तिशाली गॅझेट्स; मार्केटमध्ये लागणार आग!