Google DeepMind Job : डिग्रीची गरज नाही, पगार 10 कोटी; गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी काय हवंय?

Published : Oct 11, 2026, 02:54 PM IST

गुगल डीपमाईंडमध्ये इंजिनिअर पदासाठी एक बंपर भरती निघालीये. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही डिग्रीची अट नाही आणि पगार चक्क १० कोटींच्या घरात आहे. सध्या या नोकरीचीच सगळीकडे चर्चा आहे. पण या कामाचं स्वरूप काय आणि यासाठी कोणतं कौशल्य लागतं? जाणून घेऊया.

PREV
16
डिग्रीची गरज नाही.. १० कोटींपर्यंत पगार! गुगलमध्ये नेमकं काय काम आहे?

गुगलची आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शाखा असलेल्या 'गुगल डीपमाईंड'ने (Google DeepMind) 'पोलारिस' (Polaris) टीममध्ये इंजिनिअर्सची भरती सुरू केलीये. या नोकरीसाठी कॉलेजच्या डिग्रीची अजिबात गरज नाही, अशी माहिती गुगलचे इंजिनिअर तमाय बेसिरोग्लू (Tamay Besiroglu) यांनी शेअर केलीये. सध्या या भरतीचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे.

या नोकरीसाठी वर्षाला ५.५ लाख ते ११ लाख अमेरिकन डॉलर्स इतकं पॅकेज मिळू शकतं. भारतीय चलनात हा आकडा सुमारे ४.६ कोटी ते १०.९ कोटी रुपये इतका होतो.

पण हा सगळा पगार हातात मिळत नाही. यात मूळ पगार आणि बोनसचा समावेश आहे. मग या नोकरीत नेमकं करायचं काय?

26
काम काय असणार? AI ची क्षमता तपासायची!

AI च्या मदतीने प्रोग्राम्स लिहिणारे टूल्स (AI Coding Agents) किती चांगलं काम करतात, हे तपासण्याचं मुख्य काम या नोकरीत असणार आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअरची निर्मिती करायला सांगितल्यास, AI टूल ते अचूक करतंय का? त्यात कुठे चुका होतायत? दिलेलं काम पूर्ण होतंय का? या सगळ्याचं मूल्यांकन करण्यासाठी तुम्हाला चाचण्या तयार कराव्या लागतील.

गुगलच्या जेमिनी (Gemini) AI मॉडेलच्या क्षमता आणि त्रुटी शोधून काढणं आणि त्याची कामगिरी सुधारण्यासाठी डेटा तयार करणं, ही या कामातील मुख्य जबाबदारी आहे.

36
डिग्री नसेल तर कोणतं कौशल्य हवं?

डिग्रीची अट नाही म्हणजे कोणतंही कौशल्य नसताना ही नोकरी मिळेल, असा विचार करू नका. गुगलच्या जाहिरातीत स्पष्ट सांगितलंय की, उमेदवाराला AI कोडिंग टूल्स वापरण्याचा अनुभव असायला हवा. तसंच, तुमचं विश्लेषण आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य (Problem-solving skills) उत्तम असावं.

याशिवाय, स्पर्धात्मक प्रोग्रामिंग, गणिताच्या स्पर्धा आणि AI मॉडेल्सचं मूल्यांकन करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल. थोडक्यात सांगायचं तर, कॉलेजच्या डिग्रीपेक्षा तुमच्याकडे असलेल्या तांत्रिक कौशल्याला इथे जास्त महत्त्व दिलं जातंय.

46
१० कोटी रुपये हा पूर्ण पगार आहे का?

या नोकरीसाठी १०.९ कोटी रुपये पगार असल्याचं बोललं जातंय. पण हा आकडा वार्षिक एकूण पॅकेजचा भारतीय रुपयांतील अंदाज आहे. ही संपूर्ण रक्कम मूळ पगार (Basic Salary) म्हणून मिळत नाही.

गुगलच्या करिअर पेजवर दिलेल्या माहितीनुसार, ही १२ महिन्यांच्या करारावर (Contract) आधारित नोकरी आहे. याचा मूळ पगार वर्षाला ३.५ लाख ते ५.२५ लाख डॉलर्सच्या घरात आहे. बोनस आणि इतर भत्ते मिळून अंतिम आकडा बदलू शकतो. त्यामुळे ही १० कोटींची कायमस्वरूपी नोकरी आहे, असा गैरसमज करून घेऊ नका.

56
कॉलेजच्या डिग्रीशिवाय अशी नोकरी खरंच मिळते का?

एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता फक्त त्याच्या डिग्रीवरून ठरत नाही, हे या नोकरीच्या संधीवरून स्पष्ट होतंय. प्रोग्रामिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि AI टूल्सचा वापर यांसारखी कौशल्ये तुम्ही स्वतःच्या सरावाने, प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स आणि ओपन-सोर्स सॉफ्टवेअरमधील योगदानातूनही विकसित करू शकता.

पण गुगल डीपमाईंडसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये अशा नोकऱ्यांसाठी प्रचंड स्पर्धा असते. डिग्री नसली तरी चालते, पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे तगडा अनुभव आणि ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. एका नोकरीवरून सगळ्याच कंपन्यांनी डिग्री मागणं बंद केलंय, असा निष्कर्ष काढता येणार नाही.

66
भारतीय तरुणांनी यातून काय शिकावं?

ज्यांना AI क्षेत्रात करिअर करायचंय, त्यांनी आधी प्रोग्रामिंगचे बेसिक फंडे क्लिअर करावेत. छोटे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स बनवून प्रॅक्टिस करावी. त्यानंतर AI टूल्स वापरणं, त्यांची चाचणी घेणं आणि तांत्रिक अडचणी सोडवणं यांसारखी कौशल्ये आत्मसात करावीत.

तुमच्याकडे डिग्री असो वा नसो, संधी नक्की मिळतात. पण तुम्ही कोणता मार्ग निवडता आणि तुमची प्रॅक्टिकल स्किल्स किती मजबूत आहेत, हे जास्त महत्त्वाचं ठरतं. डिग्री नसणं हा अडथळा नाही, पण डिग्रीच्या बदल्यात तुमच्याकडे सिद्ध करता येईल असं कौशल्य असणं मस्ट आहे, हाच यातून मिळणारा धडा आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories