फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सध्या भन्नाट ऑफर्स सुरू आहेत. विशेषतः एसीवर कंपनी मोठी सूट देत आहे. या सेलमध्ये मिळणाऱ्या टॉप ५ एसी मॉडेल्स, त्यांच्या किमती आणि ऑफर्सची माहिती
साधारणपणे उन्हाळ्यात एसीची गरज जास्त असते. त्या काळात त्यांच्या किमतीही खूप वाढलेल्या असतात. पण हिवाळ्यात किंवा ऑफ-सीझनमध्ये एसीच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होतात. अशा ऑफ-सीझनमध्ये फ्लिपकार्ट सेलचा फायदा घेतल्यास तुम्हाला अगदी कमी किमतीत एसी खरेदी करण्याची संधी मिळते. बँक आणि एक्सचेंज ऑफर्समुळे या डील्स आणखी फायदेशीर ठरतात.
25
TCL 2026 मॉडेल 1 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी
टीसीएल (TCL) ब्रँडचा हा १ टन क्षमतेचा ३ स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी ७-इन-१ मोड फीचरसह येतो. हा एसी तुमची बेडरूम खूप लवकर थंड करतो. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये यावर तब्बल ४७ टक्के डिस्काउंट मिळत आहे. याची मूळ किंमत ४८,९९१ रुपये आहे, पण सेलमध्ये हा एसी फक्त २५,९९० रुपयांना उपलब्ध आहे. लहान खोल्यांसाठी एसी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा एक परफेक्ट चॉईस आहे.
35
Godrej 2026 मॉडेल 1 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी
तुम्हाला हेवी ड्युटी आणि एआय (AI) पॉवर्ड एअर कंडिशनर हवा असेल, तर गोदरेज ब्रँड हा बेस्ट ऑप्शन आहे. हा एसी १ टन क्षमता आणि इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह येतो. यात ५-इन-१ कन्व्हर्टेबल मोडसुद्धा दिलाय. यातील एआय टेक्नॉलॉजी तुमच्या रोजच्या एसी वापरानुसार योग्य तापमान सेट करायला मदत करते. बिग बिलियन डेज सेलमध्ये यावर ३३ टक्के डिस्काउंट दिला जातोय. याची एमआरपी ४२,९९० रुपये आहे, पण सेलमध्ये हा एसी २७,९९० रुपयांना मिळतोय.
एअर कंडिशनर्सच्या बाबतीत विश्वासाचं दुसरं नाव असलेल्या डायकिनच्या (Daikin) २०२६ मॉडेल १ टन ३ स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसीवर ३३ टक्के डिस्काउंट आहे. याची एमआरपी ४८,५०० रुपये आहे, पण सेलमध्ये तुम्ही हा एसी ३२,४९० रुपयांना खरेदी करू शकता.
तसेच सॅमसंग बेसपोक एआय (Samsung Bespoke AI) २०२६ मॉडेल ०.९५ टन ३ स्टार स्प्लिट एसीवर तब्बल ५२ टक्के बंपर डिस्काउंट मिळतोय. याची मूळ किंमत ६७,९९० रुपये आहे, पण सेल ऑफरमध्ये तुम्ही हा एसी ३२,४९० रुपयांना तुमचा करू शकता.
55
Blue Star 1.5 टन एसी आणि अतिरिक्त बँक ऑफर्स
मोठ्या खोल्यांसाठी जास्त क्षमतेचा एसी हवा असेल, तर ब्लू स्टार १.५ टन ३ स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी हा चांगला चॉईस आहे. ५-इन-१ कन्व्हर्टेबल मोड असलेल्या या एसीवर ४१ टक्के भारी डिस्काउंट दिला जातोय. याची एमआरपी ६१,००० रुपये आहे, पण सेलमध्ये हा एसी ३५,९९० रुपयांना विकला जातोय. तसेच फ्लिपकार्ट सेलमध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ऑफर्स वापरून तुम्ही अतिरिक्त सूट मिळवू शकता. एक्सचेंज ऑफरद्वारे ६,५०० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदाही मिळतो.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .